शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत एक परवाना रद्द, ११ औषधी दुकाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:03 IST

अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई : दुकानदारांना हयगय करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : औषधांची विक्री नियमाप्रमाणे होते की नाही, हे तपासण्याच्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासन विभाग, चंद्रपूरच्या वतीने एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील अनेक औषधी दुकानांची तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याने एका औषधी दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. तसेच स्टॉक व विक्रीत तफावत तसेच अन्य कारणांसाठी ११ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. ही कारवाई औषधी निरीक्षकांच्या तपासणीअंती सहायक आयुक्त (औषधी) मनीष चौधरी यांनी केली.

औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९४५अंतर्गत औषध विक्री व साठवणूक यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना मेडिकल स्टोअर्स चालकांना देण्यात आल्या आहेत. परंतु अनेकदा औषध विक्रेते नियम व कायद्याचे पालन न करता मनमर्जीने औषधांची विक्री करीत असतात. तसेच ग्राहकांना बिल न देणे, स्टॉक बूकवर नोंदी न घेणे, प्रतिजैविक औषधांचे बिल न देणे तसेच अन्य गैरप्रकार करताना दिसून येतात. यामुळे ग्राहकांचे तसेच शासनाचे नुकसान होत असते, शिवाय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकल्यास त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागण्याची शक्यता असते. यावर आळा घालण्यासाठी सहायक आयुक्त (औषधी) मनीष चौधरी यांनी निरीक्षकांतर्फे कारवाईचा बडगा उगारला आहे.

अल्प कर्मचाऱ्यांतही कारवाई चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनामध्ये निरीक्षकापासून अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कारवाई करण्यात मोठी अडचण जात आहे. तरीही औषधालयाची तपासणी करण्यात येत असून, दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे.

विक्रेत्यांनी या बाबींची घ्यावी काळजी नोंदणीकृत फार्मासिस्ट दुकानात बसावा. स्वतःच्या देखरेखीत औषधांची विक्री करावी. झोपेच्या गोळ्या व अन्य गंभीर आजारांवरील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शना- शिवाय विक्री करू नये. औषधांची विक्री व स्टॉकची माहिती अद्ययावत ठेवावी. व्हेटर्नरी औषधांची साठवणूक लेबलसह करावी.

"आमच्या विभागातर्फे नियमितपणे औषधालयाची तपासणी केली जाते. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी नियम व कायद्याचे पालन करीत औषधांची विक्री करावी. मागील सहा ते सात महिन्यात मेडिकल स्टोअर्स चालकांनी हयगय केल्याने तसेच औषधी निरीक्षकांच्या तपासणीत दोष आढळून आल्याने एकाचा परवाना रद्द केला, तर ११ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले."- मनीष चौधरी, सहायक आयुक्त (औषधी), चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर