शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

एक लाख ५४ हजार ६६९ व्यक्ती ‘हाय रिस्क’ श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : विषाणूंशी लढ्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी असावी लागते. अन्यथा अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त असतो. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ...

चंद्रपूर : विषाणूंशी लढ्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी असावी लागते. अन्यथा अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त असतो. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अहवालानुसार, मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ५४ हजार ६६९ व्यक्ती अति जोखमीच्या संपर्कात (हाय रिस्क) आहेत. त्यामध्ये चंद्रपुरातील ६० हजार ८७३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करणे आणि निकषात बसणाऱ्या व्यक्तींनी तातडीने लस घेणे हाच पर्याय नागरिकांच्या हातात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. शिवाय, संसर्ग झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी चार कोविड केअर सेंटर, पाच खासगी डीसीएचसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथेही अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मंगळवारपर्यंत रूग्णांची एकूण संख्या २४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अहवालानुसार, जिल्ह्यात १५ हजार १५ आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत नऊ हजार ८२८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात ९३ हजार ७९७ तर चंद्रपुरात ६० हजार ८७३ जण हाय रिस्क म्हणजे अति जोखमीच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे हाय रिस्क श्रेणीतील व्यक्तींना यापुढे स्वत:च्या आरोग्याबाबत खबरदारी पाळावी लागणार आहे.

३ लाख ९७ हजार ८७६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

जिल्ह्यात बुधवारपर्यंत ३ लाख ९७ हजार ८७६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले. यामध्ये ग्रामीण भागातून २ लाख १९ हजार ९९१ तर चंद्रपूर मनपा क्षेत्रातून एक लाख ७७ हजार ६८५ जणांचा समावेश आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची व्याप्ती वाढविल्यास रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते.

२ लाख १८ हजार १६४ जण लो रिस्क

जिल्ह्यातून एक लाख ११ हजार १८० व चंद्रपूर मनपा क्षेत्रातून एक लाख ६९ हजार ८४ व्यक्ती लो रिस्क म्हणजे कमी जोखमीच्या संपर्कात आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाची स्थिती बघता आरोग्याबाबत निष्काळजीपणा केल्यास उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही.

३ हजार ८१८ जण अजूनही गृह विलगीकरणात

आतापर्यंत ५२ हजार ७०१ ग्रामीण, २३ हजार २०८ शहरी व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ६९ हजार १२६ असे एकूण २ लाख ४५ हजार ३५ जण गृहविलगीकरणात होते. मंगळवारपर्यंत यातील २ लाख ४१ हजार २१७ जणांचे गृहविलगीकरण पूर्ण झाले. ३ हजार ८१८ व्यक्ती अजूनही गृह विलगीकरणात आहेत.

लिंगनिहाय रूग्ण

पुरुष १५२९९

स्त्री ९६६५

वयोगटानुसार रूग्ण

० ते ५ वर्षे ४००

६ ते १८- २०६८

१९ ते ४०- १७६७८

४१ ते ६०- ८७४२

६१ वर्षांवरील ३०७६