शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख 54 हजार 669 व्यक्ती ‘हाय रिस्क’ श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. शिवाय, संसर्ग झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी चार कोविड केअर सेंटर, पाच खासगी डीसीएचसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथेही अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे.

ठळक मुद्दे लस घेणे हाच पर्याय : चंद्रपुरातील ६० हजार ८७३ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विषाणूंशी लढ्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी असावी लागते. अन्यथा अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त असतो. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अहवालानुसार, मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ५४ हजार ६६९ व्यक्ती अति जोखमीच्या संपर्कात (हाय रिस्क) आहेत. त्यामध्ये चंद्रपुरातील ६० हजार ८७३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करणे आणि निकषात बसणाऱ्या व्यक्तींनी तातडीने लस घेणे हाच पर्याय  नागरिकांच्या हातात असल्याचे सध्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. शिवाय, संसर्ग झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी चार कोविड केअर सेंटर, पाच खासगी डीसीएचसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथेही अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मंगळवारपर्यंत रूग्णांची एकूण संख्या २४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अहवालानुसार, जिल्ह्यात १५ हजार १५ आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत नऊ हजार ८२८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात ९३ हजार ७९७ तर चंद्रपुरात ६० हजार ८७३ जण हाय रिस्क म्हणजे अति जोखमीच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे हाय रिस्क श्रेणीतील व्यक्तींना यापुढे आरोग्याबाबत खबरदारी पाळावी लागणार आहे. 

३ लाख ९७ हजार ८७६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जिल्ह्यात बुधवारपर्यंत ३ लाख ९७ हजार ८७६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले. यामध्ये ग्रामीण भागातून २ लाख १९ हजार ९९१ तर चंद्रपूर मनपा क्षेत्रातून एक लाख ७७ हजार ६८५ जणांचा समावेश आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची व्याप्ती वाढविल्यास रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. 

जण अजूनही गृह विलगीकरणात आतापर्यंत ५२ हजार ७०१ ग्रामीण, २३ हजार २०८ शहरी व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ६९ हजार १२६ असे एकूण २ लाख ४५ हजार ३५ जण गृहविलगीकरणात होते. मंगळवारपर्यंत यातील २ लाख ४१ हजार २१७ जणांचे गृहविलगीकरण पूर्ण झाले. गुरूवारच्या माहितीनुसार ४ हजार ९७७ व्यक्ती अजूनही गृह विलगीकरणात आहेत. 

२ लाख १८ हजार १६४ जण लो रिस्क  जिल्ह्यातून एक लाख ११ हजार १८० व चंद्रपूर मनपा क्षेत्रातून एक लाख ६९ हजार ८४ व्यक्ती लो रिस्क म्हणजे कमी जोखमीच्या संपर्कात आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाची स्थिती बघता आरोग्याबाबत निष्काळजीपणा केल्यास उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या