शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

खरीपासाठी एक लाख १२ हजार मेट्रिक टन खत

By admin | Updated: June 17, 2017 00:31 IST

सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे.

युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी : यावर्षी खताची टंचाई भासणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी खरीप हंगामात खताची टंचाई भासू नये यासाठी शासनाकडे १ लाख ३४ हजार ८७३ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी १ लाख २२ हजार ६०० मेट्रिक टन खताचे आवंटन शासनाने मंजूर केले आहे. त्यामुळे यावर्षी कुठेही खताची टंचाई निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे.दरवर्षी खरीप हंगामात खत टंचाई निर्माण होत असते. अनेक विक्रेते खताचा साठा करून ठेवत कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर जादा दराने खताची विक्री करीत असतात. यातून शेतकऱ्यांची मोठी फसगत होत असते. हा प्रकार दरवर्षीच घडत होता. त्यामुळे राज्य शासनाने यावर्षी खतविक्रीचे नवीन निकष तयार केले आहे. या निकषाच्या आधारे यावर्षी खत विक्री होणार असून यात दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय खताची मागणी लक्षात घेवून राज्य शासनाकडे खताची मागणी केली होती. मात्र मागणी केलेल्या खतापैकी १ लाख २२ हजार ६०० मेट्रीक टन खत जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. या खताचे तालुकानिहाय आवंटन जिल्हा प्रशासनाने मंजूर केले असून सर्वाधिक खत राजुरा, कोरपना, चिमूर, वरोरा व ब्रह्मपुरी तालुक्यांना वाटप केले जाणार आहे. या खतामध्ये युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी आहे. शासनाने या खताची किंमत ठरवून दिली असून जादा दर आकारल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी, त्या विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.पाच तालुक्यांना सर्वाधिक खतांची गरजचंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, तूर या सोबत सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिंदेवाही, ब्रह्मपुरी परिसरात धान तर चिमूर, राजुरा, वरोरा, कोरपना तालुक्यात कापसाचे उत्पादन होते. या पाचही तालुक्यांसाठी सर्वाधिक खताची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने ब्रह्मपुरी तालुक्याला १० हजार २० मेट्रीक टन, चिमूर तालुक्याला १४ हजार २१५ मेट्रीक टन, कोरपना तालुक्याला १४ हजार ४७६ मेट्रीक टन, राजुरा तालुक्याला १० हजार ६४१ मेट्रीक टन तर वरोरा तालुक्याला १४ हजार १३७ मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर केले आहे.५ हजार १२६ क्विंटल बियाणांची विक्रीखरिपासाठी यावर्षी भात, ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस आदी बियाणांची ७५ हजार ९९९ क्विंटल बियाणांची मागणी होती. शासनाकडून ३१ हजार ५५९ क्विंटल बियाणे प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहेत. यापैकी ५ हजार १२६ क्विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झाली आहे. यात १ हजार २७३ सार्वजनिक तर ३ हजार ८५३ खाजगी स्वरूपात बियाणे विक्री झाले आहे.युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणीकापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार प्रशासनाने शासनाकडे दोन्ही खताची मागणी केली होती. शासनाने युरिया खताचे ५३ हजार ३०० मेट्रिक टन तर डीएपी १३ हजार मेट्रिक खताचे वाटप मंजूर केले आहे.