शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विकास खर्चाची माहिती एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:56 IST

केंद व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला. हा विषय गावकऱ्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा राहिला आहे. लोेकशाही व्यवस्थेनुसार ही माहिती जाणुन घेण्याचा नागरिकांना अधिकारही आहे.

ठळक मुद्देपंचायत राज विभागाचे संकेतस्थळ विकसीत : ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला. हा विषय गावकऱ्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा राहिला आहे. लोेकशाही व्यवस्थेनुसार ही माहिती जाणुन घेण्याचा नागरिकांना अधिकारही आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पंचायतराज विभागाने याबाबत एक संकेतस्थळ विकसीत केले. या संकेतस्थळावर देश व राज्यातील ला निधीची आणि खर्चाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.ग्रामपंचायतींना बळकटी मिळावी, याकरिता विकासकामांसाठी केंद्र शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी थेट दिला जातो. ग्रामपंचायतला दिलेल्या जाणाºया या निधीत कोणत्याही यंत्रणेला हस्तक्षेप करता येत नाही. राज्य सरकारही विविध विकास योजनांमधूनही निधी उपलब्ध करून देत आहे. या निधीचा वापर गावच्या योग्य आणि मूलभूत विकास कामांसाठी होतो अथवा नाही, या प्रश्नावर सतत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंचायतराज विभागाने एक संकेतस्थळ विकसीत केले आहे. देशातील प्रत्येक राज्य, राज्यांमधील जिल्हे व गावांची वर्षभरातील वित्तीय माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वर्षनिहाय आहे. सुरुवातीला वर्ष, राज्य निवडावे, त्यानंतर जिल्हा आणि स्वत:चे गाव निवडल्यानंतर विकास कामांवर किती निधी खर्चा झाला याची माहिती काही वेळेत नजरेपुढे येते. या निधीचा स्त्रोत काय आहे, केंद्र व राज्य सरकारकडून मिळाला की ग्रामपंचायतीने स्वत:च्या तिजोरीतून खर्च केला, याचीही माहिती देण्यात आली आहे. संबंधित कामाचे स्वरुप काय होते. त्याला ग्रामसभेची शिफारस आहे काय तसेच ग्रामपंचायतीने मान्यता दिली की नाही काय याचीही माहिती उपलब्ध आहे. संबंधित काम कुणाकडून, कोणत्या अधिकाºयाकडून करून घेण्यात आले. याचे तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ग्रामपंचायतीमार्फत वर्षभरात जितकी काय विकासकामे केली जातात आणि त्यावरील होणारा वर्षभराचा खर्च नागरिकांना माहित झाल्यास ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक होऊ शकतो. नागरिकांनी या संकेतस्थळाचा उपयोग केला पाहिजे, अशी माहिती देण्यात आली.‘ग्रामविकासदूत’ अपॅमधून लोकप्रबोधन- ओमप्रकाश यादवप्रशासकीय अधिकारी चौकटीच्या पलीकडे जात नाही, अशी नागरिकांची धारणा आहे. परंतु, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश यादव हे यासंदर्भात अपवाद ठरले आहेत. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, पालक, संस्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, केंद्र प्रमुख, ग्रामविकासाशी संबंधित सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना उपयुक्त ठरेल असे ‘ग्रामदूत’ नावाचे अ‍ॅप विकसीत केले. गुगल प्ले स्टोअरमधून हा अ‍ॅप कुणालाही मोफत इन्स्टाल करता येतो.प्रयत्नवादाचे महत्त्व हमखास रूजणार‘ग्रामदूत’ या अ‍ॅपची सहा प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ग्रामविकास, शासन निर्णय कायदे, खास बळीराजासाठी, शिक्षक-विद्यार्थी-पालक-महसूल शासन निर्णय, कायदे, आदर्श गाव यशोगाथा, ग्रामविकास कट्टा, संतांचे समाज प्रबोधन व महत्त्वाची संकेतस्थळे दिली. दररोज माहिती अपडेट केली जाते. ग्राम विकासासाठी संबंधित शंकांचे निरसन करणे व संवाद प्रक्रियेसाठी अतिशय उपयुक्त आहे. जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यादव यांनी संतांची भजने, ओव्या, अभंगांचे निरूपण करणारी प्रबोधनात्मक पुस्तिकाही लिहिली आहे. जनतेच्या हितासाठी काम करायचे यातून प्रयत्नवादाचे महत्त्व रूजेल, अपेक्षा त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :government schemeसरकारी योजना