चंद्रपूर : कुलूपबंद घर हेरुन घरफोडी करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने ५९ हजार ४२० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम ऊर्फ कोहली गणेश बिश्वास (२२) रा. फुकटनगर यांच्यासह एक विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केलीअआहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुलूपबंद घरातून चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने पळविले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गौतम बिश्वास याने विधिसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून घरफोडी केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गौतम व विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यातील घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून १०.९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८५.३० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, पोलीस हवालदार संजय आतकुलवार, पोना. अमजद खान, कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार यांनी केली.
घरफोडी करणाऱ्या विधिसंघर्ष बालकासह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST