शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी बैलगाडीतून काढली विद्यार्थ्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 20:00 IST

Chandrapur News शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपून शुक्रवारी जिल्ह्यातील दोन हजार ४७२ शाळेची पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. दोन महिने शांत असलेला शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

दरवर्षी शाळा २६ जून रोजी सुरू व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच शिक्षण विभागाने ३० जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उन्हाळी सुट्या संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर शुक्रवारी शाळेची पहिली घंटा वाजली. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमविताना दिसून आले. 

पहाटेच रिक्षावाला काका घरीशाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाल्या काकांचेही काम सुरू झाले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाल्या काकांची वाट पाहत, सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते. बऱ्याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता.

कुठे हसू तर कुठे आसू

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत मित्र मिळाले म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. तर नवप्रवेशीत मुलांना आपल्या आईवडिलांपासून काही वेळ दूर राहावे लागत होते. म्हणून डोळ्यात आसू दिसून येत होते. आईवडिलांनी समजूत घालून मुलांना शाळेत पाठवल्याचे दिसून आले. 

विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतजिल्हा परिषद शाळा शुक्रवारपासून सुरू झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवही साजरा केला जाणार आहे. विशेषत: अनेक शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

टॅग्स :Schoolशाळा