शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा सभागृहात ओली पार्टी

By admin | Updated: September 1, 2014 23:28 IST

संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. त्यांच्या नावाने पंचायत समिती परिसरात बनविण्यात आलेल्या सभागृहात ग्रामसेवकांनी ओली पार्टी केली. एवढेच नाही तर शिल्लक राहिलेले

ग्रामसेवकांकडून संतांचा अवमान : ब्रह्मपुरी पंचायत समितीतील प्रकारब्रह्मपुरी : संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. त्यांच्या नावाने पंचायत समिती परिसरात बनविण्यात आलेल्या सभागृहात ग्रामसेवकांनी ओली पार्टी केली. एवढेच नाही तर शिल्लक राहिलेले अन्न नालीत फेकून दिले. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किमान या सभागृहात तरी ग्रामसेवकांकडून असा प्रकार अपेक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.येथील काही ग्रामसेवकांची बदली झाली. त्यांना निरोप देण्याकरिता समारंभाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या समारंभात अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे, महिला कर्मचारी उपस्थित असतानाही काहींनी मद्यप्राशन करीत ओल्या पार्टीचा आनंद लुटला.तत्पूर्वी दुपारी ३ वाजता प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षक म्हणून बाहेरील पाहुणे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणानंतर लगेच सहभोजन ठेवण्यात आले. भोजनात साध्या जेवनासह मासांहारी जेवणही देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाला संवर्ग विकास अधिकारी तोडेवार हे सुद्धा उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भोजनात काही आंबटशौकीनांनी मद्यप्राशन करून मासांहारावर ताव मारला. निरोप समारंभात महिलाही उपस्थित होत्या.संत गाडगेबाबा सभागृहाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले असून स्वातंत्र्यदिनी उद्घाटन झाले. याच सभागृहात मद्य व मासांहाराचे जेवन ठेवण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, जेवण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न पंचायत समितीच्या समोरील मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीत फेकण्यात आले.सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्याने ओरड केली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नालीतील अन्न काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)