शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

जुना कुनाडा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांनी केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:33 IST

वेकोलि जुना कुनाडा परियोजना माजरी क्षेत्राद्वारे हेतुपुरस्परपणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जुना कुनाडा कोळसा खाण बंद आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलन : चार तास कोळसा व माती वाहून नेणारी वाहने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वेकोलि जुना कुनाडा परियोजना माजरी क्षेत्राद्वारे हेतुपुरस्परपणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जुना कुनाडा कोळसा खाण बंद आंदोलन केले. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत वेकोलिचे कोळसा व माती वाहून नेणारे वाहने आंदोलनकर्त्यांनी बंद ठेवली होती.भद्रावती पोलिसांच्या मध्यस्थीने सबएरिया मॅनेजर, चारगाव (कुनाडा) यांच्या कार्यालयात वेकोलि अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी एरिया प्लॅनिंग आॅफीस, कुचना पवार, निखिल कुमार व सबएरिया मॅनेजर चारगावतर्फे सब एरिया मॅनेजर पंकज कुमार तसेच प्रकल्पग्रस्त पांडूरंग महाजन, मनोज मंदे, निलेश नागपुरे, रामनाथ आसुटकर, डोमा कावरी, पंढरी कावटी चर्चेदरम्यान उपस्थित होते.जुना कुनाडा प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, या प्रकल्पाला २००० ची पॉलिसी लागू असल्याने तीन एकर पेक्षा कमी शेती असल्याने या पॉलिसीत नोकरी मिळू शकत नाही, असे वेकोलितर्फे सांगण्यात आले.२०१२ च्या पॉलिसीनुसार वेकोलि अनुदान द्यायला तयार आहे. तर त्या पॉलिसीनुसार नोकरीही देण्यात यावी, असे प्रकल्पग्रस्त म्हणाले. कोल इंडियाच्या लिब्रलायझेशन पॉलिसीमध्ये फक्त अनुदान ५ लाख रुपये प्रति एकर देण्याचे प्रावधान असल्याचे वेकोलिने सांगितले.वेकोलिच्या नियमात तीन एकर पेक्षा कमी शेती असणाºया प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळत नसल्यास जमिनी शेती करण्यायोग्य करून द्याव्या व आजपर्यंतची नुकसान भरपाई वेकोलिने द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. ८ नोव्हेंबर पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीबाबत मागण्या मान्य न झाल्यास १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करणार, असे प्रकल्पग्रस्तांनी वेकोलि अधिकाºयांना सांगितले. ठाणेदार बी. मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, नरेश शेरकी, रवी दुर्गे, भीमराव पडोळे, दिनेश सूर्यवंशी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.