चंद्रपूर : देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, असे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यांनी केले.ना. हंसराज अहीर यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वास्तूचे उद्घाटन शनिवारी जटपूरा गेट सिटी बाजारच्या बाजूला पार पडले.उद्घाटक म्हणून केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर होते. अध्यक्ष म्हणून आ. नाना शामकुळे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधितज्ज्ञ अॅड. विजय मोगरे, सुधाकर रेशिमवाले, कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, रमेश पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती. यशस्वीसाठी सूर्यभान झाडे, सुमेध लोखंडे, महेश पानसे, रमेश कासुलकर, राजेश लक्कावार, राजेश पिंपळकर, संतोष अतकारे, अनिल मत्ते, राजू धांडे, आम्रपाली सोरते यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)
अधिकारी, कर्मचारी आणि सरकार यांनी समन्वयातून कार्य करावे : अहीर
By admin | Updated: January 13, 2016 01:21 IST