शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पीक विमा शिबिराला अधिकारी, कर्मचारीच गैरहजर

By admin | Updated: July 29, 2015 00:51 IST

२०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे ...

गांगलवाडी : २०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे आयोजित पीक विमा संदर्भातील शिबिराला अधिकारी व कर्मचारीच गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.दुष्काळ सदृश्य परिस्थितीपासून शेतकरी सुरक्षित रहावा या उद्देशाने शासनाच्या वतीने दरवर्षी पीक विमा काढला जातो. २०१४-१५ या वर्षात ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्या गेला होता. मात्र पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळण्यात आले. यामुळे पीक विम्याच्या निकषाबाबत शेतकरी संभ्रमात आहे. हा संभ्रम दूर होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा या अनुषंगाने सोमवारी आवळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कृषी विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात परिसरातील ११ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित झाले होते. मात्र सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी एफ.डी. शेंडे, वसुली अधिकारी पी.एस. कोलते व आवळगावचे ग्राम विकास अधिकारी पी. टी. पारधी वगळता अन्य एकही अधिकारी व कमरचारी उपस्थित नव्हते.शिबिरात उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न केले. परंतु या संदर्भात कृषी अधिकारीच माहिती देऊ शकतात, असे कारण सांगितल्याने सर्व शेतकरी परत गेले. यानंतर दुपारी १.३० वाजता ब्रह्मपुरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. डी. कारडवार व कृषी विस्तार अधिकारी बी.एम. आत्राम शिबिरात उपस्थित झाले. परंतु, यावेळी मोजकेच शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यास सांगितले. मात्र शिबिरात एकही तलाठी उपस्थित नसल्याने सातबारा व नमूना आठ अभावी शेतकरी पीक विमा काढू शकले नाही.शिबिरासंदर्भात कृषी विभागाने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना शिबिरात उपस्थित ठेवा, असे पत्र दिल्याचे कृषी अधिकारी कारडवार यांनी सांगितले. मात्र शिबिरामध्ये कुणीच अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित न राहिल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम लोणारे, सदस्य खुशाल ठिकरे, आक्सापूर उपसरपंच योगेन्द्र गणवीर, भगवान नवघडे, आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष केवळराम ठिकरे यांनी केला आहे. (वार्ताहर)