शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यालय झाले शोभेची वास्तू

By admin | Updated: June 26, 2016 00:41 IST

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे २००४ पासून नियमित कृषी विज्ञान केंद्र सुरु आहे.

संबंधित विभागाचे दुर्लक्ष : विज्ञान केंद्रातील १३ पदे रिक्तसिंदेवाही: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे २००४ पासून नियमित कृषी विज्ञान केंद्र सुरु आहे. मात्र हे कृषी विज्ञान केंद्र शोभेची वास्तू ठरत आहे.शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी प्रयोग घेणे, शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्यक्षिक राबविणे, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, युवकांना, ग्रामीण महिला तसेच विस्तार कर्मचाऱ्यांना शेतीबाबत शास्त्रीय व तांत्रिक प्रशिक्षण देणे, उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर नसल्यास त्यामधील त्रुटी दूर करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचे व शेतीवर अवलंबून असणाऱ्या राहणीमानात सुधारणा करणे हा कृषी विज्ञान केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा आहे. सदर कृषी विज्ञान केंद्रामध्ये १६ पदे मंजूर असून १३ पदे रिक्त आहेत. सध्या या केंद्रावर एक कार्यक्रम समन्वयक एक सहायक प्राध्यापक, विषयतज्ज्ञ, दुग्धशास्त्रज्ञ, कृषी विद्या, कीटकशास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिक ही महत्त्वाची पाच पदे तसेच एक सहाय्यक (कॉम्प्युटर), एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक व्यवस्थापक एक कार्यालय अधीक्षक एक स्टेनोग्राफर, दोन वाहन चालक मिळून एकूण १३ पदे रिक्त आहेत. सध्या या केंद्रात एक लिपीक व दोन शिपाई कार्यरत आहेत. येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. पोतकीले यांची बदली कृषी संशोधन केंद्रामध्ये झाली आहे. त्यामुळे येथील कार्यालयीन कामे प्रभावित झाली आहेत. तसेच या केंद्राचा पीक संग्रहालय, फळरोपवाटिका, फूल शेती फळबाग लागवड, शेततळे, बिजोत्पादन, लाख उत्पादन, या विषयावर शेतकऱ्यांच्या शेतात जावून प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. या केंद्रात विषयतज्ज्ञ नसल्यामुळे सध्या तरी कृषी विज्ञान केंद्राचे कामकाज प्रभावित झाले आहे. तसेच मानव विकास अंतर्गत फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळे तीन वर्षापासून फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा बंद आहे. या प्रयोगशाळेची दोन वाहने सध्या कार्यालयासमोर धुळ खात पडून आहे. लाखो रुपये खर्च करुन कृषी विज्ञान केंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली आहे. अनेक पदे रिक्त असल्यामुळे सध्यातरी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यालय शोभेची वास्तू झाले आहे. अकोला कृषी विद्यापीठाने रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी सिंदेवाही तालुका विकास संघर्ष समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे. (पालक प्रतिनिधी)