शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक चिंतेत : पिरलीतील मध जाते राज्यभर

By admin | Updated: July 14, 2014 01:52 IST

नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले

मधपेट्याच्या नुकसानीची झळ कायमचभद्रावती : नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले भद्रावती तालुक्यातील पिरली हे गाव मधमाशांच्या वसाहती मिळण्याचे विदर्भातील प्रमुख ठिकाण बनले आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मधमाशा पालन व्यवसायाचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील मध विदर्भातच नव्हे तर राज्यातही पोहचले आहे. परंतु मागील वर्षी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात येथील ११ मधपाळांच्या ८३ मधपेट्या वाहून गेल्या. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याची झळ मात्र या व्यवसायाला पोहचली आहे. त्यातून आजही येथील मधपाळ सावरले नसल्याचे चित्र आहे.१५ वर्षांपूर्वी येथील संजय कोलते व गोवर्धन शेंडे या युवकांनी कुठलेही प्रशिक्षण नसताना फक्त इच्छाशक्तीच्या आधारे मधमाशी पालन व्यवसायाला पिरली येथे सुरूवात केली. निसर्गातील मधमाशा शोधून व झाडाच्या पोकळीतून काढून त्या मधमाशा पेटीत टाकण्याचा सपाटा त्या युवकांनी सुरू केला. प्रशिक्षणाअभावी मधमाशा सुरूवातीला पेटीत राहत नव्हत्या. प्रशिक्षणाच्या शोधात त्यांची मधुकर भलमे व प्रा. तात्यासाहेब धानोरकर यांची भेट झाली. त्यानंतर पिरली येथील सात युवकांनी शेगावला दररोज सायकलने ये-जा करून १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि पिरली येथे शास्त्रशुद्ध पध्दतीने मधमाशी पालन व्यवसायास सुरूवात झाली. खादी ग्रामोद्योग चंद्रपूर व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमाने याठिकाणी निवासी मधपाळ प्रशिक्षण घेण्यात आले. एकट्या पिरली गावाचे ११ मधपाळ यात सहभागी झाले.आज याठिकाणी मधमाशा पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांना शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पाहिले जात आहे. या व्यवसायाला जास्त भागभांडवलाची आवश्यकता नाही. तसेच या व्यवसायामुळे परागकिरणाची क्रिया जलद होऊन शेतीच्या उत्पादनात जवळपास ४० टक्क्याने वाढ होते. याठिकाणी या व्यवसायासाठी लागणाऱ्या रिकाम्या पेट्यांचीसुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात होते.यावर्षी अत्यंल्प पावसामुळे मधमाशा पालन व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. मागील वर्षी पुरामुळे तर यावर्षी पाऊस नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील वर्षी पुरामुळे पेट्या वाहून गेल्या. वसाहती पकडून मधपेट्या भरण्यास बहुतेकांकडे रिकाम्या मधपेट्या उरलेल्या नाहीत. शासनाकडून नुकसान भरपाईही नाही. या उलट या व्यवसायाबाबत शासनाकडे नुकसानभरपाईची तरतूदच नसल्याचे सांगण्यात येते. शेतीचा उत्तम जोडधंदा म्हणून नुकसान भरपाईची शासनाने तरतूद करावी, अशी मागणी येथील मधपाळ संजय कोलते, होमेश्वर वाढई, उत्तम काकडे, गोवर्धन शेंडे, सुभाष आसूटकर, नेना पिंपळशेंडे, रवींद्र तरारे, प्रज्वल काकडे, संजय मत्ते, विनोद कोलते तसेच सरपंच विजय तरारे, ग्रामस्थ महादेव कोल्हे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)