शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाबुजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी महारक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:36 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देडॉ. हेडगेवार रक्तपेढीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. हेडगेवार रक्तपेढी व लोकमत जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव मार्गावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात सकाळी १० वाजता या शिबिराला सुरूवात होणार आहे. या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत.रक्तदान म्हणजेच जीवनदान. रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. शिबिराला वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. नाव नोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतीनिमित्त देशभरात १ जुलै हा ‘डॉक्टर डे’ म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा ‘डॉक्टर्स वीक’ म्हणून पाळला जातो. बाबुजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमएचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था या महारक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरसावल्या आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करून सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. माहितीसाठी अमोल कडुकर (९२७०१३१५८०), सोनम मडावी (९९७५६६६३५५) संपर्क साधावा.लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहनबाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेतेबंधूंसह महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूडॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. यासोबतच प्रमाणपत्र देऊ गौरवित केले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना प्रथमोपचार किट दिली जाणार आहे.