शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी आज रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

काहींनी नियोजनाच्या बैठका घेतल्या. यासंदर्भात ओबीसीसमन्वय समितीने पूर्ण तयारी केली आहे. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. मोर्चामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ५०० व्हॉलेंटिअर्सची चमू राहणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, अ‍ॅड. दत्ता हजारे, बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदकल, प्रा. विजय मुसळे यांनी दिली.  

ठळक मुद्देओबीसी समन्वय समितीची तयारी पूर्ण : चंद्रपुरातील विविध रस्त्यांवर पोलिसांचे पथसंचलन

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसींचे संवेधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी तसेच ओबीसीच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओबीसींचा चंद्रपुरात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमी परिसर व शहरात पथसंचलन करण्यात आले.चंद्रपुरातील दीक्षाभूमी परिसरातून हा मोर्चा निघणार आहे. शहरातील विविध मार्गावर फिरल्यानंतर चांदा क्लब ग्राऊंडवर या मोर्चाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजबांधवांमध्ये बुधवारपासूनच उत्साहाचे वातावरण आहे. अनेक गावातून बुधवारी मोटारसायकल रॅली काढल्या. काहींनी नियोजनाच्या बैठका घेतल्या. यासंदर्भात ओबीसीसमन्वय समितीने पूर्ण तयारी केली आहे. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. मोर्चामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ५०० व्हॉलेंटिअर्सची चमू राहणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, अ‍ॅड. दत्ता हजारे, बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदकल, प्रा. विजय मुसळे यांनी दिली.   

दीक्षाभूमी परिसर सज्जगुरुवारी दीक्षाभूमी परिसरातून ओबोसींचा मोर्चा निघणार आहे. यानिमित्त दीक्षाभूमीवर बुधवारीच संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. दीक्षाभूमीच्या पटांगणावर ओबीसी बांधव गुरुवारी सकाळपासूनच एकत्र येऊ लागतील. त्यानंतर ६ -६ च्या रांगेत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा रामनगर, जटपुरा गेट ते जयंत टॉकीज- गांधी चौकातून डावीकडे वळण घेत सराफा लाईन मार्गे कस्तुरबा चौक येईल. येथून डावीकडे वळण घेत मार्गे जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शिनी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर जातील.  

मोर्चाला विविध संघटनांसह राजकीय पाठिंबाजातीनिहाय जनगणनेसाठी होत असलेल्या या मोर्चाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांनी समर्थन दिले आहे. या मोर्चात प्रत्येक ओबीसी बांधवाने सहभागी व्हावे, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. या मोर्चाला यंग चांदा ब्रिगेडनेही पाठींबा दिला असून मोर्चा दरम्यान मोर्चात सहभागी होणाºया मोर्चेकरुंना गांधी चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी सांगितले. यासोबतच मोर्चाला सत्य शोधक समाजानेही समर्थन दिले आहे, अशी माहिती समाजाचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे यांनी दिली.  

वाहतूक व्यवस्थेत केला असा बदलमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळात बदल करण्यात आला आहे. बसस्थानक ते कस्तुरबा चौक आणि गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौकातील वाहतूक बंद राहील. सोबतच वरोरा नाका मार्गे संत कवलराम चौकातून दवा बाजारमार्गे जटपुरा गेटपर्यंत येणाऱ्या वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे. नागपूर मार्गे बल्लारपूर, मूलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहो वरोरा नाका उड्डाण पुलावरून सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मार्गे जातील. या दोन्ही येणारी वाहने याच मार्गाने नागपूर मार्गे जातील. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वणी, घुग्घुस, गडचांदूरकडे जाणाऱ्या  येणाऱ्या प्रवाशांना रहमत नगर, नगीना बाग, दाताळा मागार्चा पर्याय खुला राहील.

११०० पोलिसांचा चोख बंदोबस्तकायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मोर्चाच्या मार्गाची पाहणी केली.  शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहा पोलीस उपविभागीय अधिकारी,  जिल्हातील विविध ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि हजारो पोलिसांची फौज मोचार्साठी तैनात करण्यात केली. बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे १०० अधिकारी, ९०० पोलीस शिपाई व दंगा नियंत्रण पथक तैनात असणार आहे. 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती