शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिमिलेअरच्या नावाखाली ओबीसींची फ सवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:35 IST

ओबीसींच्या हितासाठी भारतीय संविधानात मूलगामी तरतुदी करून विकासाची संधी उपलब्ध करून दिली़ मात्र, आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील १५ टक्केदेखील अंमलबजावणी केली नाही़ या समाजात फु टीरतेची बिजे पेरुन दिशाभूल केली़ .....

ठळक मुद्देव्ही़ ईश्वरैया : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसींच्या हितासाठी भारतीय संविधानात मूलगामी तरतुदी करून विकासाची संधी उपलब्ध करून दिली़ मात्र, आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील १५ टक्केदेखील अंमलबजावणी केली नाही़ या समाजात फु टीरतेची बिजे पेरुन दिशाभूल केली़ आता क्रिमिलेअरच्या नावाखाली फ सवणूक सुरू असून त्याविरुद्ध देशव्यापी आंदोलने गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती व्ही़ ईश्वरैया यांनी व्यक्त केले़ राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते़अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्राचार्य डॉ़ बबन तायवाडे तर मंचावर महासंघाचे समन्वयक डॉ़ अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, प्रतिभा जीवतोडे, इको- प्रो संस्थेचे बंडू धोतरे आदी उपस्थित होते़ निवृत्त न्यायमूर्ती ईश्वरैया म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, डॉ़ पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या लोकशाहीनिष्ठ महापुरुषांनी ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी मोठे योगदान दिले़ व्ही़ पी़ सिंग यांनी मंडल आयोग स्थापन करून ओबीसींच्या हक्कांना घटनात्मक संरक्षण दिले़ मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी केवळ मतांचे राजकारण ओबीसींवर अन्याय केला़ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले होते, की क्रिमिलेअर लागू करून अंमलबजावणी झाली नाही; तर ओबीसींना दिलेल्या घटनात्मक सोईसवलतींवर गदा येईल़ सध्याची ओबीसीविरोधी धोरणे बघितल्यास सर्वोच्च न्यायालयाचा इशारा खरा ठरत आहे, असे ते म्हणाले. डॉ़ डॉ़ बबन तायवाडे, सचिन राजूरकर यांनी मनोगत व्यक्त केले़डॉ़ अशोक जीवतोडे यांनी जाहीर व्याख्यानाची भूमिका विशद केली़ निवृत्त न्यायमूर्ती ईश्वरैया व पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांचा सत्कार करण्यात आला़