शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आंदोलनकर्ते रवींद्र टाेंगेंना रुग्णालयात हलविले, विजय बलकीने सुरू केला अन्नत्याग

By राजेश मडावी | Updated: September 22, 2023 17:41 IST

ओबीसी आंदोलन चिघळणार : ३० सप्टेंबरला ‘चंद्रपूर जिल्हा बंद’चे आवाहन

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने शुक्रवारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले तर त्यांच्या जागी विजय बलकी यांनी १२ व्या दिवसापासून उपोषण सुरू केले. दरम्यान, राज्य सरकारने अजुनही आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी संघटनांनी आज मातोश्री सभागृहात बैठक घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि ३० सप्टेंबरला ‘चंद्रपूर जिल्हा बंद’चे आवाहन केले.

राज्य शासनाने मराठा समाजाला कुणबी जातीचे जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, यासह अन्य मागण्यांसाठी रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने आज रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही, असा आरोप करून पुढची दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी १२ वाजता तुकूम मातोश्री विद्यालयात ओबीसींच्या विविध संघटनांनी सभा घेतली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आंदोलनाचा पुढील कार्यक्रम जाहीर केला.

बैठकीत ॲड. पुरुषोत्तम सातपुते, दिनेश चोखारे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, ॲड. दत्ता हजारे, हिराचंद्र बोरकुटे, गजानन गावंडे, अनिल धानोरकर, अनिल डहाके, रविंद्र शिंदे, निलेश बेलखेडे, राजेश बेले, शाम राजूरकर, शाम लेडे, रामराव हरडे, प्रदीप देशमुख, अक्षय येरगुडे, भूषण भुसे, संजय कन्नावार, विलास माथनकर, सतीश मालेकर, सुधाकर काकडे, उमाकांत धांडे, प्रेमा जोगी, रणजित डवरे, ॲड. सोनुने, विजय मुसळे, मनीषा बोबडे, कुसुम उदार, किरण देरकर,गोमती पाचभाई उपस्थित होते.

असे आहे ओबीसी आंदोलनाचे पुढील टप्पे...

शनिवारी (दि.२३) जनता कॉलेज चौक, नागपूर मार्गावर चक्का जाम आंदोलन होईल. रविवारी (दि. २४) मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व बहुजन कल्याण मंत्री यांची तिरडी काढून केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवर यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे. २५ सप्टेंबरला सर्व तालुकास्थळी आंदोलन व ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ओबीसी संघटनांनी घेतला.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीStrikeसंपchandrapur-acचंद्रपूर