लाभार्थ्यांना प्रतीक्षा : आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांची वणवणनांदाफाटा : शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने नरेगा योजनेतून विहिर बांधकाम करून देत आहे. यात अनेक आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम केले. मात्र कोरपना तालुक्यातील इजापूर येथील अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण होवूनही अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.इजापूर येथील गरीब आदिवासी शेतकरी विठ्ठल बाजीराव सलाम व नामदेव ताऊ कुळमेथे गेल्या आठ महिन्यांपासून विहिरीच्या अनुदानासाठी पंचायत समितीचे उंबरठा झिजवित आहेत. तरी त्यांना विहीर बांधकामाचे पैसे मिळालेले नाही. सदर शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल महिन्यातच विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर या योजनेचे अनुदान ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होणार असल्याचे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. बऱ्याच प्रतिक्षेनंतर ग्रामपंचायतीने या कामाचे अनुदान पंचायत समितीमार्फत आलेच नसल्याचे सांगून आपली बाजू सावरली. आता पंचायत समितीकडेही रक्कम जमा झाली नसल्याचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहे. लाख रुपये खर्च करून शासन शेतकऱ्यांना सिंचनासाठी अशा योजना लागू करते. मात्र काम पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी कोरपना पंचायत समितीचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी साळवे यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपली कैफीयत मांडली. परंतु, त्यांनीही शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारातालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बांधकामाची अशीच अवस्था आहे. काम पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. तेव्हा शासनाने त्वरित व संबंधित विभागाने विहिर बांधण्याचे अनुदान जमा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, पंचायत समिती सभापती रवी गोखरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोती काकडे, सचिव अरुण रागीट, युवा आघाडी अध्यक्ष अविनाश मुसळे, रमाकांत भालेकर, प्रल्हाद पवार, चंदू चटप, अनंता गोंडे, अविनाश मुसळे, बंडू राजूरकर, राजू मोहितकर, वामन निपूंगे आदींनी दिला आहे.
नरेगा विहिरींचे अनुदान रखडले
By admin | Updated: August 29, 2016 01:22 IST