शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

By admin | Updated: July 16, 2014 00:05 IST

राज्य सरकारने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून कर्मचारी आंदोलनात उतरले असून

चंद्रपूर: राज्य सरकारने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून कर्मचारी आंदोलनात उतरले असून नगरपालिकेपुढे धरणे आंदोलनाने संपाची सुरूवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील नगरपालिकांचे कर्मचारी मंगळवारी धरणे आंदोलनाला बसले. यामुळे पहिल्याच दिवशी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी महासंघाने पाठिंबा दिल्याने १०० टक्के कर्मचाऱ्यांचा या आंदोलनात सहभाग झाला आहे.संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या १९ मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार केल्याने नगरपालिका व्यवस्थापन कोलमडण्याची चिन्हे आहेत. परिणामी नागरिकांची कामे प्रभावित होणार आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात न.प. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे. भारतीय नगरपरिषद कामगार संघाने कर्मचाऱ्यांचे वेतन १०० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावे, अनुकंपाधारकांच्या नेमणूका स्थायी व अस्थायी पदाची अट न घालता तात्काळ भरती करावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील न.प.कर्मचाऱ्यांना १५ टक्के अतिरिक्त भत्ता देण्यात यावा, २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती तात्काळ लागू करावी, यांसह तब्बल १९ मागण्या शासनाकडे केल्या आहेत. बल्लारपूर नगरपालिकेत महाराष्ट्र प्रदेश कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामगोपाल मिश्रा, जिल्हाध्यक्ष सुरेश आंबेकर, सरचिटणीस तुकड्यादास डुंबरे, महिला प्रतिनिधी हंसाराणी आर्य, अनिल बंडीवार, भद्रावती नगरपालिकेत अध्यक्ष पी.एस. मांडवकर, अभियंता गुप्ता, संतोष नामोजवार, सुनिल मेश्राम, विजय डुकरे, अलका पिदूरकर, पी.के.वाणी, प्रभाकर उंबरकर, अजय लडके, अरविंद भुसारी, ब्रह्मपुरी येथे आर.एस.ठोंबरे, व्ही.डब्ल्यू शेंडे, मनोज मासूरकर, एम.एन.मालोदे, एम.आर. दवे आदींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (लोकमत चमू )