चंद्रपूर :गोवा हे स्थळ प्रत्येकांकरिता फिरण्याचे आकर्षक स्थळ आहे. स्थानिक पर्यटकांना गोव्याला जाण्याकरिता मुंबई मार्गे जावे लागत होते. खूप लांबचा आणि महागडा प्रवास करावा लागायचा. रेल्वे मंत्रालयाने ही अडचण लक्षात घेता आता स्थानिकांकरिता गोव्याला जाणारी ट्रेन ही बल्लारपूर मार्गे जाणार आहे.
गोवा हे अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ असून तेथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. आधी गोव्याला जायचे झाल्यास मुंबईमार्गे जावे लागायचे. मात्र, आता बल्लारपूरमार्गे ट्रेन उपलब्ध झाल्याने गोव्याला जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे.
०६३८९ गोंदिया-वास्कोदिगामा ट्रेन मंगळवारी बल्लारपूर येथे आली असता येथील रेल्वे सल्लागार समिती सदस्य अजय दुबे, श्रीकांत उपाध्याय, प्रभुदास तांड्रा, मौला निषाद आंदीनी लोको पायलट ई. संपत आणि सूरज कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ही रेल्वे आठवड्यात एकदा असून याचा मार्ग जस्सिडिड जंक्शन झारखंडपासून सुरू होऊन ती राऊरकेला, बिलासपूर, रायपूर, गोंदिया, बल्लारशाह, मंचिरियाल, काजीपेट, सिकंदराबाद, रायचूर आदी स्टेशनवरून वास्कोडिगामा गोवाला पोहचणार आहे.