शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला धूर फवारणीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:38 IST

पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

रुग्ण सख्या वाढली : डासांच्या प्रादुर्भावाने चंद्रपूरकर वैतागलेचंद्रपूर : पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी मनपा प्रशासनाला एकदोन वॉर्डाचा अपवाद सोडला तर धूर फवारणीचा मुहुर्तच सापडलेला दिसत नाही. मनपाच्या या हलगर्जीपणामुळे चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. परिणाम मलेरिया, व्हायरल फिवरचा प्रकोप वाढला आहे.नाल्या, गटारे चोकअप होऊन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये, साथीचे आजार बळाऊ नये, यासाठी उन्हाळ्याच्या अखेर शहरातील नाल्या, गटारांचा उपसा करून स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. यावर्षी मनपाने नाल्या, गटारांची सफाई केली. मात्र ही सफाई थातूरमातूर होती. चंद्रपूर शहरातून मोठे नाले वाहतात. या नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे या नाल्यांचा उपसा होऊ शकत नाही. जोरदार पाऊस झाला की नाल्यातील घाण रस्त्यावर येते. असा अनुभव यावर्षीही येत आहे. परिणामी मनपाची नाले सफाई यंदाही फार्स ठरली आहे.यासोबतच पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमा होत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी, धूर फवारणी करणे गरजेचे असते. नागरी आरोग्य अबाधित रहावे, यासाठी महानगरपालिकेने नियमितपणे ही कामे करावयाची असतात. मात्र या कामाचा सध्या मनपालाच विसर पडल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूरचा वाढता विस्तार बघता मनपा प्रशासनाची कामे सुरळीत पार पडण्याकरिता मनपाने झोननिहाय विभागणी केली आहे. तीन झोन कार्यालयातून हा कारभार चालविला जातो. महानगरपालिकेच्या कार्यालयात जेवढे विभाग आहेत, ते सर्व विभाग या झोन कार्यालयात कार्यान्वित झाले आहे. विविध औषधांची फवारणी आणि धूर फवारणीही याच झोन कार्यालयाच्या माध्यमातून केली जाते. वॉर्डनिहाय धूर फवारणी करण्याचे वेळापत्रकच महानगरपालिकेत तयार असते. असे असले तरी धूर फवारणीचा मुहुर्त मात्र अद्याप मनपाला सापडला नसल्याचे दिसून येत आहे. औषधांची फवारणी आणि फागींग मशीनद्वारे केली जाणारी धूर फवारणी होत नसल्यामुळे अनेक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. डासांमुळे चंद्रपूरकरांची झोपच उडाली आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढणे सुरू केले आहे. चंद्रपूर शहरात मागील काही दिवसात तापाच्या रुग्णात दुपटीने वाढ झाली आहे. अनेक रुग्ण मलेरियाने बाधित होऊन खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. डासांच्या प्रकोपामुळे चंद्रपूरकर वैतागले असतानाही मनपाला मात्र त्याचे काही देणे घेणे असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)डासांचा नायनाट करण्यासाठी इतर साधनांपेक्षा फॉगींग मशीनने केलेली धूर फवारणी उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येक शहरात ही फवारणी नियमितपणे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महानगरपालिकेत एक चारचाकी वाहनांवर असलेली मोठी फॉगींग मशीन व तीनही झोन कार्यालयात प्रत्येक तीन फॉगींग मशीन्स उपलब्ध असल्याची माहिती आहे. झोन कार्यालयाशी संलग्न असलेल्या प्रत्येक वॉर्डात आठ किंवा पंधरा दिवसाआड फॉगींग मशीनद्वारे धूर फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर चंद्रपुरातील बहुतांश वॉर्डात अद्यापही धूर फवारणी झाली नाही. नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष द्यावेशहरात नियमितपणे फॉगींग मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मात्र यात मनपा प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याने आता प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात धूर फवारणी करण्यासाठी मनपा प्रशासनाला बाध्य करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.