सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना आता पाणी हवे आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. डवरणी, खुरपणीची कामे बंद आहे. धान गाठ्यात जोरदार पाऊस नसल्याने तेथील रोवण्या थांबल्या आहेत. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्याने रोवणी आटोपली. मात्र निसर्गाच्या भरवशावर असणाऱ्या शेतकऱ्याची रोवणी थांबली आहे. पऱ्हे रोवण्यायोग्य होऊनसुद्धा पाणी नसल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत.
आता पिकांना हवे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST