शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने १,४९७ भाडेकरू दुकानदारांना दिलेल्या नोटीस दहशतीसाठीच

By admin | Updated: September 13, 2016 00:42 IST

चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक हजार ४९७ भाडेकरू दुकानदारांनी लिजचे नुतनीकरण न केल्यास ..

काँग्रेसचा आरोप : मालमत्ता करआकारणीच्या नव्या नोटीस नियमबाह्यचंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक हजार ४९७ भाडेकरू दुकानदारांनी लिजचे नुतनीकरण न केल्यास गाळे रिकामे करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. हा प्रकार गाळेधारकांमध्ये दहशत निर्माण करणारा असल्याची टीका काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन गावंडे गुरूजी यांनी केली आहे.महानगर पालिकेने मागील आठवड्यामध्ये चंद्रपूर शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले होते. ज्या गाळेधारकांनी लिजचे नुतनीकरणे केले नसेल अशांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यावर गाळेधारकांमध्ये बरीच खळबळ उडाली होती. दरम्यान, गाळेधारकांच्या एका शिष्ठमंडळाने माजी खासदार नरेश पुगलिया यांची भेट घेवून आपबिती मांडली. नगरपालिका अस्तित्वात असताना आणि पुढे महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर अनेक गाळेधारकांनी आपसी समझोत्याने अथवा नाईलाजाने गाळे दुसऱ्यांना हस्तांतरित केले होते. त्या बदल्यात हस्तांतरण शुल्क म्हणून २५ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. बरेचदा व्यापाऱ्यांनी आर्थिक स्थिती वाईट असते, अथवा ज्याच्या नावे गाळा असेल त्याचा मृत्यू झाल्याने मुलांना गाळा हस्तांरित करण्याची प्रक्रिया झाली आहे. त्या बदल्यात मनपाने शुल्कही जमा करून घेतली असताना आयुक्तांनी असा निर्णय घेतल्याबद्दल गावंडे गुरूजी यांनी या पत्रातून आश्चर्य व्यक्त केले आहे.मालमत्ता कराच्या आकारणीसाठी आलेल्या नोटीसांवरही या पत्रातून आक्षेप घेण्यात आला आहे. महानगर पालिकेने मालमत्ता करात वाढ केल्यावर जनआंदोलन झाले होते. अखेर मनपाने आमसभेत निर्णय घेवून जुन्या दराने मालमत्ता कर घेण्याचे ठरविले होते. असे असतानाही नव्या दराने आकारणीच्या नोटीस आल्या आहेत. दबावतंत्राचा वापर करून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व निर्णयांवर मनपा आयुक्तांनी फेरविचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा. असे न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गांधी शाळेच्या ‘त्या’ जागेवर स्वच्छतागृह उभारण्यास विरोधगांधी चौकालगत असलेल्या महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या सध्याच्या जागेवर स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भातील पत्र आयुक्तांनी काही नगरसेवकांना पाठविले आहे. मात्र यावर काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. ही शाळा ऐतिहासिक असून अनेक विद्यार्थी येथून घडले आहेत. या जागेभोवती दोन मंदीरे, पोलीस स्टेशन महानगर पालिकेची इमारत आणि बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह न उभारता वाचनालय उभारावे अथवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्याय ठेवण्यात आला आहे.