शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मनपा, वेकोलिसह १४ उद्योगांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीर : हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांपर्यंत आणा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या व सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा ‘पर्यावरण भरपाई’चा शॉक दिला होता. हा धक्का सहन करतानाच आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना नवा धक्का दिला आहे. वेकोलिच्या पाच खाणी, सहा उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण व चंद्रपूर महापालिका, अशा १४ जणांना नोटीस बजावून प्रदूषणावर नियंत्रण आणून हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिले आहे.४ मार्च रोजी जारी केलेल्या या नोटीसमध्ये आपापल्या परिसरात व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे व पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले आहेत.चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारा यावेळी ज्या उद्योगांना ही नोटीस जारी केली आहे त्यात चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्र, धारिवाला इन्फ्रास्ट्रक्चर लि., ग्रेस मेटॅलिक प्रा. लि., घुग्घुस येथील लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट, बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त, राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह वेकोलि चंद्रपूरची लालपेठ, दुर्गापूर, पदमापूर ओपनकास्ट, वणी क्षेत्रातील घुग्घुस ओपनकास्ट व बल्लारपूर क्षेत्रातील बल्लारपूर ओपनकास्ट या कोळसा खाणींचा समावेश आहे.उपरोक्त उद्योगांना यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे नोटीस बजावण्यात आला आहे. काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही.त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.नियमानुसार या उद्योगाकडून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रदूषणाच्या मानकाचे पालन केले तर चंद्रपुरातील पूर्ण नाही तर किमान अर्धे प्रदूषण कमी होणे शक्य आहे, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. यावरील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहेत.मानकाच्या आसपासही पोहचले नाही उद्योगप्रदूषण कमी करणाऱ्या नियमाची चंद्रपूरलगतच्या उद्योगांकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्रदूषणासंदर्भातील मानकापर्यंत कोणताही उद्योग अद्याप पोहचू शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही शुध्द हवा मिळत नाही. प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांनी सांगितले की कोळसा खाणीसाठी असलेल्या मानकानुसार एसपीएमची मात्रा ५०० तथा आरएसपीएमची मात्रा २५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. स्पंज आयरन उद्योगासाठी ही मात्रा २००० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. मात्र प्रत्यक्षात उद्योग हा मानकाच्या जवळपासही पोहचू शकले नाही.प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योगांना नियमाचे पालन करावे लागणार आहे. सध्या हिरवळीचा परिसर ३३ टक्के आहे. तो वाढवून ४० टक्क्यांपर्यंत आणावा लागणार आहे. पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्याचे लक्ष आहे. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.- मधुकर लाड, प्रादेशिक अधिकारी,महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषण