ब्रह्मपुरी : येथील शिवाजी चौकातील व्यावसायिक गाळे बांधकाम अनधिकृतपणे करण्यात येत असल्याच्या नगरसेवकासह काहींच्या तक्रारी नगरपरिषदेला प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने अखेर चार महिण्याच्या कालावधीनंतर नगरपरिषदेने अनधिकृत बांधकाम त्वरित बंद करून एका महिन्याच्या कालावधीत ताबडतोब पाडण्याचे आदेश नोटीसद्वारे बजावले आहे.ब्रह्मपुरी शहरातील मुख्य राज्य महामार्गालगत शिवाजी चौकात व्यावसायिक गाळे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर बांधकाम आरमोरी राज्य महामार्गाच्या बाजुला सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे तसेच घेतले असल्यास सादर करावे अन्यथा आपले बांधकाम विनापरवानगीने अनधिकृतपणे सुरू असल्याचे समजून कारवाई करण्यात येईल. या आशयाचे पत्र २४ डिसेंबर २०१४ ला देण्यात आले होते. तद्नंतर राज्य महामार्गावर नियमानुसार नागरी भागात रस्त्याच्या मध्यापासून इमारत रेषा २० मीटर व नियंत्रण रेषा ३७ मीटर असते. मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजणी केली असता ते १७ मीटर एवढे मध्यापासून अंतर आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवैध बांधकामप्रकरणी नागरिकांना नोटीस
By admin | Updated: March 1, 2015 00:44 IST