शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आॅनलाईन नव्हे, तर संगणीकृत

By admin | Updated: July 5, 2015 00:48 IST

जिल्ह्यात येत्या ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आॅनलाईन नामांकन भरण्याची चर्चा वेगात असली ...

ग्रामपंचायत निवडणूक नामांकननिकालानंतर मिरवणुकी काढण्यावर बंदीनामांकनासाठी तहसील कार्यालयात मदतनिसाची व्यवस्थातालुकास्तरावर प्रथमच निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीचंद्रपूर : जिल्ह्यात येत्या ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आॅनलाईन नामांकन भरण्याची चर्चा वेगात असली तरी, तसे करण्याची आवश्यक्ता नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्याची गरज नसून उमेदवारांसाठी संगणीकृत उमेदवारी अर्ज असणार आहेत. त्यासाठी ँ३३स्र://स्रंल्लूँं८ं३ी’ीू३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर नामनिर्देशन भरण्याची सुविधा आहे. भरलेल्या अर्जाचे प्रिंटआऊट संबंधित उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिका-याकडे सादर करावयाचे आहे.जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके उपस्थित होते.या संदर्भात माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संगणकीकृत अर्ज भरण्याची सुविधा संग्राम केंद्र व महाआॅनलाईन या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ग्रामीण जनतेला संगणकीय प्रणालीचा अनुभव नसल्याने तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मदतनीस ठेवण्यात येणार आहे. मात्र मदतनीसाकडून अर्ज भरुन घेतल्यानंतर तो स्वाक्षरी करण्यापूर्वी बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी. नामर्निदेशनपत्रातील सर्व रकाणे भरणे अनिवार्य आहे.जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतींच्या २ हजार ६८ वार्डसाठी ४ आॅगस्टला निवडणूक होत आहे. यासाठी ९ लाख १६ हजार ४६१ मतदारांची नोंद झाली आहे. मतदानाच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून मतदान केंद्रांसमोर शेड उभारले जाणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदारांनी आपली नावे यादीत आहेत अथवा नाहीत, याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मतदानासाठी निर्धारित १७ ओळखपत्रापैकी कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. (जिल्हा प्रतिनिधी)थकबाकीदार नसावानामर्निदेशनपत्रासोबत कुठलीही थकबाकी नसल्याचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. परंतु मालमत्ता कराची थकबाकी असल्यास त्याला सुट देण्यात आली आहे. उमेदवारांनी खचार्चा रोजचा हिशेब दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. प्रवगर्वतून नामांकन भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला असल्यास त्याचा पुरावा व सहा महिण्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. मिरवणुकीवर बंदीनिकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. यासाठी कुठेही परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. संवेदनशिल मतदान केद्रांच्या याद्या तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.