शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

म्युकरमायकोसिसवरील औषधी मिळेना; पॉसॅकोनाझोल गोळ्यांचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख आता घसरणीला लागला आहे. मात्र मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. बाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना थोडा दिला; परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नावाचा भयानक आजार काहींना जडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोरोना निगेटिव्ह झालेले काही रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. अशा २० रुग्णांची जिल्हा आरोग्य प्रशासनाने नोंद घेतली.

ठळक मुद्देकेमिस्टकडे दररोज विचारणा : औषधांचा काळाबाजार होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिस नावाच्या काळी बुरशी आजाराने त्रस्त केले आहे. चंद्रपुरात अशा २० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली. मात्र, शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये म्युकरमायकोसिसवरील औषधीच मिळत नाही. शिवाय पॉसॅकोनाझोल गोळ्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणेच या औषधांचाही काळाबाजार होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख आता घसरणीला लागला आहे. मात्र मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. बाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना थोडा दिला; परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नावाचा भयानक आजार काहींना जडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोरोना निगेटिव्ह झालेले काही रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. अशा २० रुग्णांची जिल्हा आरोग्य प्रशासनाने नोंद घेतली. हे रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यावरील औषधी अत्यंत महाग आहे. लिपोसोमल एम्फोटिसिरीन-बी हे औषधच मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नाही. अनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. 

चंद्रपुरात २० पेक्षा अधिक रुग्णजिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे अधिकृत २० रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. मात्र, यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.कोरोनापूर्वी वर्षाला १० ते १२ एम्फोटिसिरीन -बी इंजेक्शन लागायचेआता ६० ते ७० इंजेक्शनची चंद्रपुरात दररोज मागणी आहे.पॉसॅकोनाझोल गोळ्यांचा तुटवडा आहे. रुग्णांच्या कुटुंबांकडून दररोज  या औषधांची मागणी होत असल्याची माहिती एका औषध विक्रेत्याने दिली.

औषधांअभावी रुग्णांचा जीव धोक्यातम्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना एम्फोटिसिरीन -बी हे इंजेक्शन दिले जाते. शिवाय पॉसॅकोनाझोल गोळ्याही द्यावे लागतात. परंतु औषधेच उपलब्ध नसल्याने खासगी डॉक्टर्स काहीे आनुषंगिक औषधांचा वापर करीत आहेत. अशा रुग्णांना औषध मिळाले नाही तर डोळा व अन्य अवयव निकामी होण्याचा धोका आहे.

७५०० रुपयांचे इंजेक्शन १५ हजारांना ! म्युकरमायकोसिसवरील रुग्णाला देण्यात येणाऱ्या लिपोसोमल एम्फोटिसिरीन-बी   एका इंजेक्शनची किंमत ७ हजार ६०० आहे. परंतु, काही विक्रेते ते १५ हजारांना विकत आहेत, अशी तक्रार एका रुग्णाच्या कुटुंबाने दिली तर चंद्रपुरात सात दिवसांपासून हे इंजेक्शनच नसल्याने मिळणार तरी कसे, असा प्रश्न जटपुरा गेट परिसरातील एका औषध विक्रेत्याने उपस्थित केला. 

जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण हवे

म्युकरमायकोसिस झालेल्या गरीब रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारने दिली. चंद्रपुरातील २० पेक्षा किती रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत आहे, हे प्रशासनाने अद्याप जाहीर केले नाही. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाला. दरम्यान, नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर रेमडेसिविर वितरणाची जबाबदारी प्रशासनाने स्वत:कडे घेतली. म्युकरमायकोसिसवरील औषधांबाबतही जिल्हा प्रशासनाने अशी कार्यवाही करण्याची गरज आहे.

डॉक्टर म्हणतात... या विषयावर बोलायचे नाहीम्युकरमायकोसिसग्रस्त रूग्ण उपचार घेत असलेल्या चंद्रपुरातील पाच हॉस्पिटलशी संपर्क साधला. मात्र, या आजाराबाबत व रूग्णाविषयी सध्या काही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या