शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार रूग्णांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:03 IST

१४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे.

ठळक मुद्देफिरते रुग्णालय : १९ डिसेंबरला रवाना होणार लाईफ लाईन एक्स्प्रेस

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे. जगात लाईफ लाईन एक्स्प्रेस म्हणून प्रसिध्द असलेली ही गाडी १९ डिसेंबरला चंद्रपूर जिल्हावासियांचा निरोप घेणार आहे, अशी माहिती संयुक्त माहिती उपप्रकल्प अधिकारी अनिल प्रेमसागर यांनी दिली.इम्पॅक्ट या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी सुरुवातीला गावोगावी जावून लोकांना वैद्यकीय सेवा देत होते. परंतु नंतर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत रूग्णालय पोहचविण्यासाठी १६ जुलै १९९१ ला लाईफ लाईन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या मदतीने आतापर्यंत १८६ प्रकल्प राबविण्यात आले. बल्लारपुरात ही एक्स्प्रेस पोहचल्यानंतर हजारो रूग्णांनी हजेरी लावली. यातील बºयाच रूग्णांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. एकूण नऊ हजार ६४१ रूग्णांची नोंद या १४ दिवसात झाली आहे. ५८४ रूग्णांच्या डोळयांवर शस्त्रक्रिया करण्यात येवून दोन हजार ९४ रूग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. नाक, कान, घसा संदर्भात तक्रारी असलेले एक हजार १५० रूग्ण येथे आले. त्यातील ८२ गरजू रूग्णांवर तर २९२ रूग्णांच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली.ना. मुनगंटीवारांचे नियोजन कौतुकास्पदइम्पॅक्टने आतापर्यंत १९ राज्यातील किमान १५० जिल्हयात फिरते रूग्णालय नेले आणि किमान १० लाख रूग्णांनी याचा लाभ घेतला. बºयाचवेळा कुतुहलामुळे या रूग्णालयाला पाचारण करण्यात येते आणि नंतर सर्वांची तारांबळ उडते. एक्स्प्रेस आली की नंतर आयोजकातील बरेच लोक पसार होतात. हा अनुभव आहे. परंतु बल्लारपुरात तसे झाले नाही. तालुकास्थानी ही गाडी असताना कल्पनेपलिकडील संख्या गाठता आली. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या नियोजनामुळे ते शक्य होऊ शकले. कोणताही त्रास येथे प्रकल्प चालविताना झाला नाही, अशी प्रतिक्रिया इम्पॅक्टचे उपप्रकल्प प्रमुख अनिल प्रेमसागर यांनी दिली.