शासकीय लेटलतीफी : मागण्या सुटणार कशा?कुचना : भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजरीच्या समस्या निवारण्यासाठी पत्राचा प्रवास खा. हंसराज अहीर चंद्रपूरचे कार्यालय व्हाया जि.प. चंद्रपूर मार्गे पं.स. भद्रावती ते माजरी असा चालला. हा प्रकार चक्क नऊ महीने चालला. समस्या निवारण्यासाठीच्या या पत्राची प्रत माजरी ग्रामपंचायतीला मिळण्यासाठी एवढा कालावधी लागला तर त्या पत्रात उल्लेखीत केलेल्या पंधरा समस्या निवारण्याला किती वर्ष लागतील, असा प्रश्न पत्र लिहणारे सुधीर उपाध्याय यांनी केला आहे. माजरी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असलेल्या पंधरा समस्यांची सोडवणूक करून माजरी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी येथील माजी जि.प. सदस्य व भद्रावती भाजपा तालुका सचिव सुधीर उपाध्याय यांनी चंद्रपूर जि.प. चे अध्यक्ष व राज्यमंत्री हंसराज अहीर यांना २ फेब्रुवारी २०१५ ला एक पंधरा मागण्याचे पत्र लिहले. त्या पत्राला संदर्भ घेत मंत्र्याच्या कार्यालयातून २७ मार्च २०१५ ला ते पत्र मागण्याच्या निवेदनासह जि.प. अध्यक्षासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.स.) जि.प. चंद्रपूर यांनी १० सप्टेंबर २०१५ ला भद्रावती पं.स. चे संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पाठविले. तेथून हे पत्र १९ सप्टेंबर २०१५ ला माजरी ग्रा.पं. च्या सरपंच, सचिवाला पाठविण्यात आले. भद्रावती पंचायत समितीकडून आपण माजरी ग्रा.पं. ला पत्र पाठविल्याच्या प्रतिलिपी मंत्री अहिर यांचे स्वीय सहायक, अध्यक्ष जि.प. चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.स.) व सुधीर उपाध्याय यांना पाठविण्यात आले. एकुणच शासकिय लालफितशाहीचे उदाहरण म्हणून माजरी ग्रामपंचायतीच्या या समस्या निराकरणाच्या पत्राची लालफितशाहीमुळे कसी दुरवस्था झाली, हे लक्षात येते. पत्र लिहताना ग्रामपंचायतीत सत्ता भाजपाची नव्हती. मात्र आता समस्याग्रस्त पत्राचा चेंडू भाजपाच्या पारड्यात पडल्यामुळे मागणी करणाऱ्यांनाच आता पूर्तता करावी लागणार आहे. कारण माजरी ग्रामपंचायत भाजपाच्याच ताब्यात आहे. (वार्ताहर)
समस्या निराकरण पत्राचा नऊ महिन्यांचा प्रवास
By admin | Updated: October 9, 2015 01:47 IST