शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्याच्या बालकाला बिबट्याने झोपेतून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:36 IST

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविल्याची घटना घडली.

ठळक मुद्देआईने केला पाठलाग, दीड कि.मी. अंतरावर मृतदेह आढळला

सुनील घाटेचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.स्वराज सचिन गुरुनुले असे मृत बालकाचे नाव आहे. गडबोरी येथील सचिन गुरनुले यांचे कुटुंब शनिवारी नेहमीप्रमाणे घरी झोपी गेले. स्वराज हा बालक आईजवळ झोपला होता. आई आणि स्वराज गाढ झोपेत असताना पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास विबट तिथे आला. घरात शिरून आईसोबत खाटेवर झोपलेल्या स्वराजला बिबट्याने झोपेतच उचलले. दरम्यान, त्याची आई झोपेतून जागी झाली. तिने आरडाओरड केली व बिबट्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु बिबट्या बालकाला घेऊन वेगाने पसार झाला.ही माहिती पहाटेच वनविभाग सिंदेवाही यांना दिली. परंतु वनविभागाचे कर्मचारी गडबोरी येथे सकाळी पोहताच बालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. गावकरी, पोलीस विभाग, वनविभाग यांच्या पुढाकारातून परीसर पिंजून काढला. अखेर गुरुनुले यांच्या घरापासून दोन कि. मी. अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळला.दरम्यान, याची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली. सदर बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी स्वराजचा मृतदेह ग्रामपंचायतीमध्ये आणण्यात आला. आधी बिबट्याचा बंदोबस्त करा मगच शवविच्छेदन करा, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वनविभागाकडून मृत बालकाचे वडील सचिन गुरूनुले यांना वनविभागाकडून ३० हजार रोख रक्कम देण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून बिबट गावातील शेळ्या फस्त करीत असून गावात बिबट्याची दहशत असून गावकरी भयभित झाले आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या