शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शौचाचे कारण सांगून ‘ती’ घरातून बाहेर पडली आणि परतलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:35 IST

भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता. चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.

ठळक मुद्देमृतक तीन महिन्याची गर्भवतीमृत्यूचे कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत एका एकोणवीस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही महिला तीन महिन्याची गर्भवती होती. या घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे. भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. दरम्यान चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.

नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा व चप्पल आढळून आली. यामूळे शंकेची पाल चुकचुकली. गोंडपिपरी पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचिताचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनच्या अगदी पूर्वीच तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रूचीताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पिएसआय पटले हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.शवविच्छेदनास विलंबरूचिताचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीसांनी पंचनामा केला. यानंतर तिचे शव गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. पण यावेळी वैदकीय अधिक्षक उपस्थित नव्हते. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याने दुसऱ्या डॉक्टरांनी आपणाकडून शवविच्छेदन शक्य नसल्याचे सांगितले. यामूळे काल रात्री तिचे शव चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले.

 

टॅग्स :Deathमृत्यू