शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्हा परिषदेत लोकाभिमुख नवी कार्यसंस्कृती रूजविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

विविध विभागांच्या फाईल्स तुंबवून ठेवणे हे प्रशासकीय गतिमानतेला बाधक आहे. याचे विकासकामांवरही अनिष्ट परिणाम होतात. प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्यानंतर किती कालावधीत काम पूर्ण होणार, याचा एक टाईम बाँड अत्याश्यक असतो. त्या दृष्टीने एक वर्क ट्रॅकिंग प्रोसेस तयार करणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे व अन्य प्रलंबित समस्या मार्गी लावणेही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ठळक मुद्देप्रशासकीय गतिमानतेसाठी वर्क ट्रॅकिंग प्रोसेस

राजेश मडावीचंद्रपूर : पंचायत राज व्यवस्थेमुळे लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. शासनाने अनेक विकासाभिमुख योजना सुरू केल्या. खरे तर या योजनांमध्ये सर्वसामान्यांच्या शाश्वत विकासाची बीजे दडली आहेत. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नागरिक मोठ्या आशेने बघतात. त्यामुळे गावखेड्यांतून समस्या घेऊन जिल्हा परिषदेत येणाऱ्या जनतेचा कदापि हिरमोड होऊ देणार नाही. लोकाभिमुख नवीन कार्यसंस्कृती रूजिवणार अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विकासाच्या नवीन संकल्पनांबाबत त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.कोरोना संकटातच जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्याने कोणत्या बाबींना प्रथम प्राधान्य देणार, असे विचारताच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी म्हणाल्या, कोरोनाचे संकट कायम आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही प्रभावीच ठरल्या आहेत. यापुढील संकटांवर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि अन्य पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार आहे. महिला व बालकांचे आरोग्य हा विषय माझ्या आस्थेचा आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी आदिवासी विकास प्रकल्पात विविध योजना राबवून बालकांचे कुपोषण, महिलांच्या अ‍ॅनिमिया, आदी समस्या दूर केल्या. हे गंभीर प्रश्न सर्वत्रच आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत उपक्रम सुरू करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. महिला बचतगटांबाबत स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलावून सद्य:स्थिती आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचेही प्रश्न जाणून घेणार असल्याचे सीईओ सेठी यांनी सांगितले.

प्रशासकीय गतिमानतेसाठी वर्क ट्रॅकिंग प्रोसेसविविध विभागांच्या फाईल्स तुंबवून ठेवणे हे प्रशासकीय गतिमानतेला बाधक आहे. याचे विकासकामांवरही अनिष्ट परिणाम होतात. प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्यानंतर किती कालावधीत काम पूर्ण होणार, याचा एक टाईम बाँड अत्याश्यक असतो. त्या दृष्टीने एक वर्क ट्रॅकिंग प्रोसेस तयार करणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे व अन्य प्रलंबित समस्या मार्गी लावणेही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दर्शनी भागावर लावणार मोबाईल नंबरचा फलक- कामे घेऊन जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागणार नाही, यासाठी कार्यालयाच्या दर्शनी भागावर माझ्यासह विभागप्रमुखांच्या मोबाईल नंबरचा फलक लावणार आहे. मी दौऱ्यावर असताना कुणी कार्यालयात आलेच तर ते माझ्याशी अथवा संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. अडचणी मांडतील, अशी माहिती डॉ. मिताली सेठी यांनी दिली.

नुसता आराखडा नको; विकासदृष्टी हवीजलजीवन मिशनमध्ये वर्धा व नागपूर जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूर जिल्हा मागे आहे. प्रत्येक टप्प्यात जिल्हा कसा अग्रस्थानी राहील, याकडे लक्ष देणार आहे. लोकांच्या हातांना रोजगार मिळावा, यासाठी मनरेगा कामांची व्याप्ती वाढवू. रोजगाराअभावी मजुरांचे परप्रांतांत स्थलांतर होणार नाही यावर कटाक्ष राहील. निधीची कमतरता नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करताना ‘डेव्हलपमेंट व्हिजन’कडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्याचे डॉ. सेठी यांनी सांगितले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद