शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नीडोनाॅमिक्सने कोरोनाकाळातील आर्थिक संकटावरही मात करता येणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही ...

चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही असायला हवी. आपली गरज लक्षात घेऊन खर्च केला तर कोरोनासारख्या संकटावरही मात करता येणे सहज शक्य आहे, असे विचार कुरुक्षेत्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आवश्यकतावादी अर्थशास्त्र सिद्धान्ताचे जनक (नीडोनॉमिक्स) डाॅ. एम. एम. गोयल यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

येथील जनता महाविद्यालयात नॅक समितीचे सदस्य अध्यक्ष म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सेवानिवृत्त प्राध्यापक मोहम्मद अकबर खूर होते. भारतासह जगातील कोणत्याही देशातील आर्थिक व गैरआर्थिक समस्यांचे समाधान आवश्यकतावादी अर्थशास्त्रात आहे. यासोबतच हिंसा, आतंकवाद, शोषण, भेदभाव, असंतोष आणि समाजात पसरलेल्या भ्रष्टाचारासह अपेक्षा यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांवर ‘आवश्यकतावादी अर्थशास्त्र’ हे रामबाण उपाय आहे, असेही डाॅ. गाेयल म्हणाले. या वेळी त्यांनी भगवत् गीतेतील उदाहरणे सांगितली.

जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीला कोणीही नाकारू शकत नाही. हे सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे. नैतिक व्यवहारातून यावर मात करता येणे शक्य आहे. यासाठी उपभोक्ता, उत्पादक, व्यापारी तसेच सर्व निर्मातांसह सुविधांचा उपभोग करणाऱ्यांनी भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा नेमकी गरज पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. बाजारात १० रुपयांची वस्तू आहे. आणि तीच वस्तू महागडीपण आहे. केवळ ब्रॅण्ड व्हॅल्यू लक्षात घेऊन महागडी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जातो. परंतु ती वस्तू आणि तिची किंमत यामध्ये ताळमेळ बसतो काय, हे ती वस्तू खरेदी करताना विचारात घेणे म्हणजेच आवश्यकतावादी अर्थशास्त्र आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा भारतच नव्हेतर, जगातील सर्व देशांना आर्थिक मंदीवर मात करून आपली अर्थव्यवस्था सुरळीत करता येणे शक्य आहे, याकडे डाॅ. गोयल यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. एम. सुभाष, डाॅ. एन. आर. बेग, डाॅ. अनिता हुडा, डाॅ. इम्यनुएल कोंड्रा, प्रा. रवी वरारकर उपस्थित होते.