ब्रह्मपुरी: येथील ख्रिस्तानंद स्कूलची विद्यार्थिनी नेहा सिंग नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या परिक्षेत ब्रह्मपुरीतून नव्हे तर जिल्ह्यात प्रथम आली. आ. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी तिची भेट घेवून तिच्या पुढील इंजिनिअरींगच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. परीक्षा मंडळाच्यावतीने नुकताच १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद स्कूलची विद्यार्थिनी नेहा सुभाष सिंग हिने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. १३ जूनला आ. विजय वडेट्टीवार यांनी तिला आपल्या येथील कार्यालयात बोलावून घेत तिचा सत्कार केला. हलाखिच्या परिस्थितीतही अव्वल येऊनही उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचण होती. आ. वडेट्टीवारांनी स्वत: तिच्या इंजिनिअरींगच्या प्रत्येक वर्षी लागणारा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तिने नोकरी लागल्यानंतर अशाच गरजू मुलांना आर्थिक सहाय्य करुन त्यांना मदत करण्याचे आश्वासन तिच्याकडून घेतले. (तालुका प्रतिनिधी)
नेहा सिंगच्या शिक्षणाचा खर्च वडेट्टीवार उचलणार
By admin | Updated: June 16, 2015 01:14 IST