शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

प्रगणकांना झाले व्याघ्रदर्शन

By admin | Updated: May 23, 2016 00:52 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला शनिवारी रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.

२०० मचानी : ताडोबात बिबटांचीही संख्या मोठीचंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला शनिवारी रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या दरम्यान, अनेक प्रगणकांना वाघासह बिबट व अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन घडले.दरवर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने ताबोडा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची गणना केली जाते. ही गणना करण्यासाठी वन्यजीव प्रेमींना सहभागी करून घेतले. जाते. साधारणत: एका मचानीवर चार प्रगणक असतात. त्यांच्यासोबत एक किंवा दोन वनरक्षक असतात. यावर्षी ताडोबाच्या बफर झोन क्षेत्रात ११८ तर कोअर झोन क्षेत्रात ८२ मचानी उभारण्यात आल्या होत्या. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात शेकडो वन्यजीव प्रेमींनी प्रगणना केली. त्यात वाघ,अस्वल, हरिण, बिबट यासह विविध प्राण्यांचे प्रगणकांना दर्शन झाले.यासंदर्भात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गणपत गरूड यांना विचारणा केली असता, अतिशय उत्साहात आणि कोणत्या विघ्नाशिवाय ही प्रगणना पार पडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रगणनेसाठी अनेकांनी आपली नावे नोंदविली होती. परंतु नाव नोंदविणाऱ्यांपैकी यावर्षी अनेकजण आलेच नसल्याची माहितीही त्यांनी दिली. आकडीवारीबाबत विचारण केली असता, अद्याप अपडेट आकडेवारी प्राप्त व्हायची असल्याचे त्यांनी सांगितले. बफर क्षेत्रात २५ वाघ, १५ बछडे, ९ बिबट दिसल्याची प्राथमिक माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. अन्य प्राण्यांचेही दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वादळाची भीतीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे केल्या जाणाऱ्या वन्यप्राणी गणनेला दरवर्षी वादळाचा फटका बसतो. मागील दोन वर्षांपासून प्रगणक हा अनुभव घेत आहेत.मागील वर्षी बुद्ध पौर्णिमेला जोरदार वादळ आले. त्यामुळे प्रगणकांचे प्रचंड हाल झालेत. हा अनुभव लक्षात घेता, यंदाही वादळाची भीती होती. मात्र निसर्गाने साथ दिली.