राजुरा तालुक्यातील सुमठाना येथे ग्रामपंचायत सुमठाना व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता मोहीम अभियानाचा प्रारंभ माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्याहस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय सदस्य अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ ॲड. राजेंद्र जेणेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा विदेशकुमार गलगट, गावचे सरपंच भास्कर देवतळे, उपसरपंच अरुणा ताकसांडे, पोलीसपाटील मोनिका परसुटकर, पोलीसपाटील नीळकंठ नगराळे, वामन देवतळे, सेवानिवृत्त शिक्षक पहानपटे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना मोहुर्ले, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर कुबडे, प्रमोद ताकसांडे, मुख्याध्यापक मठाले, नरेंद्र चहारे, राहुल लोहे, गजानन झाडे, शिक्षक सुनील सोयाम, आकाश नगराळे, अंगणवाडी सेविका पूनम येरणे, उषा येरणे, विमल लोहे, गोपिका परसुटकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कोटनाके यांनी केले. सूत्रसंचालन मठाले यांनी केले.