शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

गाव विकासासाठी लढणाऱ्या पुढाऱ्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST

: चिमूर तालुक्यात ८५ ग्रामपंचायत निवडणूक राजकुमार चुनारकर चिमूर : तालुक्यात ८५ गावांत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान जोरात सुरू ...

: चिमूर तालुक्यात ८५ ग्रामपंचायत निवडणूक

राजकुमार चुनारकर

चिमूर : तालुक्यात ८५ गावांत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान जोरात सुरू आहे. ग्रामपंचायतीत गाव पुढारी निवडून जाणार आहेत. सदस्य, सरपंचपद केवळ मानाचे नाही, तर ते कामाचे पद आहे. केंद्र, राज्य शासनाचा निधी थेट गावाला मिळतो आहे. गावाला निधी आणि अधिकारही वाढला आहे. त्यामुळे गावाचे कारभारीही तितकेच सक्षम, कल्पक, गाव विकासाच्या ध्येयाने प्रेरित असलेले पाहिजेत. त्यामुळे मतदारांनीही गाव कारभाऱ्यांची निवड करताना सजग असले पाहिजे.

गेल्या सहा वर्षांत तालुक्यातील ग्रामपंचायतींना करोडोचा निधी मिळाला आहे.

केंद्र व राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणावरील निधी आता थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. केंद्रीय वित्त आयोगाकडून येणारा शंभर टक्के निधी पूर्वी जिल्हा परिषदांना मिळत होता. कामाचे नियोजन आणि खर्च जिल्हा परिषदेतून होत होता. मात्र गेल्या पंधरा वर्षात धोरणे बदलत गेली आणि वित्त आयोगाकडून येणारी शंभर टक्के रक्‍कम थेट ग्रामपंचायतींना मिळत गेली. पाच वर्षात ग्रामपंचायतींना करोडो रुपये मिळाले आहेत. आता पंधराव्या वित्त आयोगाची ८० टक्के रक्‍कम थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. सन २०२०-२१ मध्येही ग्रामपंचायतींना करोडो रुपये मिळाले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांमधून थेट ग्रामपंचायतींना निधी येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभाराला अतिशय महत्त्व आहे.

तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान जोरात सुरू आहे. गावागावात ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातून चुरस वाढली आहे. ही चुरस निवडणुकीनंतर विकासाच्या राजकारणातही दिसली पाहिजे. त्यासाठी निवडून जाणारे कारभारी सक्षम व गाव विकासाचा ध्यास घेतलेले असले पाहिजेत. असे कारभारी निवडून देणे हे गावातील प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. असे असले तरी तालुक्यातील विकासाचा ध्यास असलेले किती गावपुढारी निवडून येतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.

बॉक्स

केंद्र पुरस्कृत योजनांमधून उपलब्ध होणारा निधी

सर्व शिक्षा अभियान (वर्गखोल्या,शाळा, शौचालय व इतर सुविधा), बाल विकास योजना (अंगणवाडी इमारत, पूरक आहार, इतर साहित्य), राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान, पाणीपुरवठा वीज देयकाच्या ५० टक्के अनुदान, स्वच्छ भारत अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बायोगॅस प्रधानमंत्री आवाससह घरकुलाच्या अन्य योजना, अन्य इतर योजना

यातून निधी मिळतो.

बॉक्स

ग्रा.पं.च्या स्वतःच्या नियंत्रणाखालील निधी

ग्रामपंचायतीचे स्व-उत्पन्न (करांपासून मिळणारे उत्पन्न), ग्रामनिधी (ग्रामपंचायतीसाठी राज्य शासनाने आकारणी करून वसूल केलेल्या करामधील ग्रामपंचायत हिस्सा), पंधरावा वित्त आयोग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान (सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन निधी), जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणारा निधी, लोकसहभाग, स्थानिक खासगी कंपन्यांकडून मिळणारा सीएसआर, शासनाकडून मिळणारी बक्षिसे, पारितोषिके, पुरस्कार रक्कम. आदी प्रकारे ग्रामपंचायतींना वर्षाला करोडोच्या घरात निधी येतो.

बॉक्स

ग्रामसभेला महत्त्व

ग्रामपंचायतींचा कारभार हा चार भिंतींच्या आत चालणारा कारभार एवढ्यापुरताच मर्यादित नाही आणि मर्यादित राहू नये म्हणून ग्रामसभांचे महत्त्वही अबाधित ठेवले आहे. पण ग्रामसभेला अडवाअडवी, जिरवाजिरवीच्या राजकारणातून पाहिले जात असल्यामुळे ग्रामसभा बदनाम होत आहेत. अशा प्रकारामुळे मूळ हेतूच बाजूला पडत आहे.