शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना राजकीय धडे देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे ...

बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर

चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते; मात्र काही वर्षांतच या मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. काही मशीन चार्जिंग करण्यासाठी चार्जर नसल्याने मशीन बंद आहेत.

बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत; मात्र या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठा सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू आहेत; मात्र बारमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारांत वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज एक तरी मुलगी छेडछाडीची किंवा अत्याचाराची बळी ठरत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या नराधमांना धडा शिकविण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर पातळीवर मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वजन काट्यांची तपासणी करावी

चंद्रपूर : दरवर्षी विक्रेत्यांच्या वजन काट्याची तपासणी करण्याचे निर्देश आहेत; मात्र अनेक व्यापाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी बाजारामध्ये तर अनेक विक्रेते वजनाऐवजी दगडाचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे

चंद्रपूर : गृहविभागाने पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे, तसेच सैन्यभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीतजास्त युवक या भरतीत सहभागी व्हावेत, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.

मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते; मात्र आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणकचालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यामुळे प्रशिक्षण शिबिराची गरज आहे.