शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नवरगावात मिरचीच्या सातऱ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:45 IST

येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदहा लाखांचे नुकसान । मिरची व बारदाना जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.नागपूर येथील मिरची व्यापारी यांनी नवरगाव येथे मिरचीचे देठ तोडण्यासाठी सदर राईसमील परिसरात सातरा मांडला होता. या ठिकाणी दररोज दीडशे- दोनशे कामगार मिरचीचीचे देठं तोडण्याचे काम करीत असतात. नेहमीप्रमाणे शनिवारलाही हे काम सुरू असताना मिरची सातऱ्याला व वर छावणीसाठी बांबु टाकून बांधलेला पोत्यांवर अचानक आग लागली. काही कामगाराच्या लक्षात ही घटना येताच कामगार सैरावरा पळू लागले. तोपर्यंत लगेच आगीने रौद्ररूप धारण केले. प्रत्येक कामगार आपला जीव वाचविण्यासाठी तर काही कामगार मालकाच्या मिरचीचे नुकसान होऊ नये म्हणून मिरचीच्या पोत्यासह बाहेर कसेबसे पळाले.आग नेमकी कशी लागली, हे कळू शकले नाही. मात्र, दुपारी कडक उन्हामुळे मिरची मोडतात. तेव्हा दुपारी त्यावर पाणी मारले जाते. यासाठी लगतच्या विहिरीवर पाणी मारण्यासाठी मोटारपंप बसविला होता. मोटारपंप सुरू करण्यासाठी स्वीच आॅन करताच ठिणग्या उसळल्या. यातील ठिणगी मिरच्यांच्या पोत्यावर पडून आग लागली असावी, असा अंदाज तेथील कामगारांनी वर्तविला. ज्या परिसरात आग लागली, तिथे विद्युत विभागाची डिपी होते. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.उपस्थिती रजिस्टरही जळालेया सातऱ्यावर काम करणाऱ्या मजुरांचे कामगार हजर असण्याचे रजिस्टर व माल ने-आण करण्याचे रजिस्टर जळाल्याने आपली मजुरी मिळणार की नाही अशी सभ्रमावस्थी मजुरवर्गामध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :fireआग