शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:38 IST

मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : परिसरातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी (ता.राजुरा) : मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.गोवरी परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू व निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग हा एकमेव शेतकऱ्यांचा एकमेव आधार आहे. परंतु दिवसेंदिवस निसर्गाचे रुप पूर्णत: पालटल्याने सर्व उलटे चक्र फिरायला लागले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी वर्षानुवर्षापासून भरडला गेला आहे. आणि ती परिस्थिती आजही शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उत्पादनात भरभराट होईल असे शेतकºयांना वाटत होते.मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल असे वाटत असतानाच दिवस काही भागात समाधानकारक पाऊस पडला. शेतकºयांनी लगबगीने कपाशी लागवड व सोयाबिनची पेरणी केली. यावर्षी दुबार पेरणीचा फटका शेतकºयांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन खरीप हंगामाचा तोंडावर पावसाने शेतकºयांना दगा दिला. उसणवारी व कर्ज काढून महागड्या बियाण्यांची शेतकºयांनी पेरणी केली.जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे पाण्याअभावी जमिनीतच करपायला लागले आहे. शेतकºयांनी पैशाची जुळवाजुळव करुन बियाणे खरेदी केली. त्यांच्या खिशात आता दमडीही पैसा शिल्लक उरली नाही. शेतकºयांवर असे दु:खाचे आभाळ कोसळले असतानाच पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली. येथेच शेतकºयांचा घात झाला.शासन शेतकºयांच्या वेदना समजून घेत नाही. निसर्ग शेतकºयाना साथ देत नाही. शेतकºयांना पाठीवर मायेने हात फिरवून त्यांचे आभाळभर दु:ख समजून घेणारा दाता कुणीच उरला नाही. शेतकºयांचा हा एकाकी लढा आयुष्यभर असाच अविरत सुरु आहे. निसर्गाला लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती बेभरवशाची झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा आली आहे.शेतकरी असा आयुष्यभर वेदनांनी भरडला जात असताना या जगाच्या पोशिंद्याकडे कुणाचेही लक्ष जाऊ नये ही कृषीप्रदान देशाची मोठी शोकांतिका आहे.ऊन, वारा, पावसाची जराही तमा न बाळगता शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायमची निराशाच आली आहे. याच काळ्या मातीत जन्म घ्यायचा आणि आयुष्याला सायंकाळी अखेरचा श्वासही हतबल होऊन इथेच सोडायचा, अशी विपरीत परिस्थिती शेतकºयांवर आली आहे. पाऊस पडला नाही तर शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.