शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर साकारतेयं राष्ट्रीय उद्यान

By admin | Updated: August 6, 2016 00:40 IST

५० एकर विस्तृत जागेवर आणि चंद्रपूर- बल्लारपूर या महामार्गावर राष्ट्रीय उद्यान आकार घेत असून त्याचे काम जलदगतीने सुरु आहे. कामाची गती बघता,...

वसंत खेडेकर  बल्लारपूर५० एकर विस्तृत जागेवर आणि चंद्रपूर- बल्लारपूर या महामार्गावर राष्ट्रीय उद्यान आकार घेत असून त्याचे काम जलदगतीने सुरु आहे. कामाची गती बघता, हे उद्यान महिना- दीड महिन्यात जनतेकरिता खुले होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने हे उद्यान आकारास येत असून या उद्यानाला देशाचे माजी राष्ट्रपती स्व. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात येणार आहे. उद्यानाच्या मध्यभागी स्व. कलाम यांचा १५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. या उद्यानात वन तलाव, लक्ष्मण झुला, मचान, बालोद्यान, या बोलोद्यानात बालकांना खेळण्याकरिता विविध वस्तू आदी राहणार आहे. तद्वतच उद्यानाचा समस्त परिसर पाम, फूल व फळ झाड, शोभिवंत अशा वृक्ष वेलींनी बहरणार आहे. हिरव्या श्रीमंतीसह देखण्या वस्तूंनी हे उद्यान श्रृंगारणार आहे. उद्यानात फेरफटका मारण्याकरिता वळणदार पायवाटा व त्यांच्या कडेला मेहंदीची झाडे लावली जात आहेत. वन तळ्याचा आकार इंग्रजी एस प्रमाणे असून त्यात छोट्या बोटी चालतील. या उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर प्रेरणादायी प्रसंग रंगविले जाणार आहेत. या उद्यानाचे काम वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.चंद्रपूरपासून बल्लारपूरला जाणारा मार्ग बरेच वर्षे उपेक्षितच राहिला. या रोडच्या दर्जाकडे चंद्रपूर प्रशासनाने फारसे लक्ष दिले नाही. या मार्गावर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर चंद्रपूर शहर ते महामार्गाला अप्रोच होणाऱ्या रोडची स्थिती सुधारली आहे. या दोन अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे, पुढे भिवकुंड नाल्याजवळील सन्मित्र सैनिकी विद्यालयामुळे या रोडचे महत्त्व वाढले. आता स्व. कलाम यांच्या स्मृतीत होत असलेल्या या विस्तृत उद्यानाने या महत्त्वात भर पडणार आहे. या बायपास मार्गावर चंद्रपूर मेडीकल कॉलेज बांधण्याचे ठरले असून त्यानंतर या रोडला आणखी महत्त्व येणार आहे. चंद्रपूर- बल्लारपूर भागात सहल स्थळ नाही, ही उणीव या उद्यानाने भरुन निघणार आहे.