राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोर्टातील खालील प्रकारची ३ हजार ५०० हुन अधिक प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यात समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आदींचा समावेश राहणार आहे.
सदर लोकअदालतमध्ये तडजोड व समझोतानामा नोंदविण्यासाठी पक्षकारांची ओळख पडताळुन व्हॉटस्ॲप कॉलींग तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे कार्यवाही करण्यास मान्यता मिळाली आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर, येथे संपर्क करावा.
या राष्ट्रीय लोक अदालत संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या. कविता अग्रवाल यांनी केले आहे