भाजपाचा धिक्कार : सूडबुध्दी उगवत असल्याचा पुगलिया यांचा आरोपचंद्रपूर : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे तीव्र पडसाद चंद्रपुरात उमटले. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ व इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्रातील भाजपा सरकारचा धिक्कार करून शनिवारला जाहीर निषेध करण्यात आला.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांवर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून न्यायालयीन प्रक्रियेत विनाकारण गोवण्यात आले. भाजपा सरकारने यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी या जनाधार नसलेल्या नेत्याला पुढे केले. सदर प्रकार काँग्रेसला बदनाम करणारा आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर आकसापोटी सुडबुध्दीचा आहे. भाजपाचा कुटील डाव काँग्रेस पक्ष हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिला.भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी व दिल्ली येथील पटियाला न्यायालयाने सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून मान राखला. न्यायदानात त्यांच्यासह इतर नेत्यांना विनाअट जामीन मंजुर झाला. याचे पडसाद येथे उमटले. भाजपाचा धिक्कार व सोनिया गांधी तथा राहुल गांधी यांचा जयजयकार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला.येथील गांधी चौक येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया व युवा नेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात भाजपाचा निषेध करण्यात आला. यावेळी बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, गजानन गावंडे, घनश्याम मुलचंदानी, अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, संजय महाडोळे, प्रशांत दानव, चंद्रशेखर पोडे, देवेंद्र बेले, सकीना अंसारी, राजेश रेवलीवार, श्रीनिवास पारनंदी, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, कविता खरतड, जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे, अनेकश्वर मेश्राम, वसंत मांढरे, रामदास वाग्दरकर, गजानन दिवसे, बाळू चांदेकर, स्वप्नील तिवारी, चेतन गेडाम, मोंटू मानकर तर इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाचे नेतृत्व नंदू नागरकर यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, अॅड. विजय मोगरे, देवराव भांडेकर, सुनिता लोढीया, अश्विनी खोब्रागडे, डॉ. आसावरी देवतळे, प्रमोद राखुंडे, डॉ. विजय देवतळे, महेश मेंढे, प्रकाश देवतळे, केशव रामटेके, अॅड. भास्कर दिवसे, संजय रत्नपारखी आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे चंद्रपुरात पडसाद
By admin | Updated: December 20, 2015 00:44 IST