वरोरा : राष्ट्रीय स्तरावर आयोजीत ऊर्जा व्यवस्थापनेतील १७ वा राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी प्रथमच वरोरा येथील जीएमआर कंपनीने पटकाविला आहे.सीआयआय ऊर्जा संवर्धन प्रकल्प अंतर्गत ऊर्जा संवर्धन क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्याकरिता सर्वोत्तम ऊर्जा संवर्धन प्रणाली लागू करण्याकरिता राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजीत करण्यात येते. ऊर्जा क्षेत्रातील भारत देशातील २८ कंपन्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यातील अकरा विद्युत प्रकल्पांनी अंतीम फेरीत प्रवेश केला. त्यात जीएमआर वरोरा, टाटा पॉवर व एनटीपीसी या तीन कंपन्याची निवड १७ व्या ऊर्जा व्यवस्थापन उत्कृष्ठता राष्ट्रीय पुरस्काराकरिता करण्यात आली. अत्यल्प कालावधीत जीएमआर वरोरा प्रकल्प कार्यान्वीत झाला. त्यातच ऊर्जा व्यवस्थापन उत्कृष्ठ राष्ट्रीय पुरस्कार जीएमआर कंपनी वरोराने पटकावून ऊर्जा क्षेत्रात आपला नावलौकीक मिळविला आहे. जीएमआर वरोराने ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनाची सर्वच स्तरावर दखल घेण्यात आली आहे. सदर पुरस्कार सीआयआय ग्रीन बिझनेस सेंटर हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात सीआयआय अध्यक्ष शोभना कर्मानेही यांनी जीएमआर वरोरा चमूस प्रदान केला आहे. हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. (तालुका प्रतिनिधी)
जीएमआर वरोराला ऊर्जा व्यवस्थापनेतील राष्ट्रीय पुरस्कार
By admin | Updated: September 15, 2016 00:56 IST