शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने उतरविल्या इंग्रजी नावाच्या पाट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:46 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतरही मराठीत बोर्ड न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेने रविवारी खळखट्याक आक्रमक आंदोलन करीत इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरविले.

ठळक मुद्देखळखट्याक आंदोलन : दुकानदारांना सात दिवसांचा अल्टीमेटम्

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतरही मराठीत बोर्ड न लावणाºया दुकानदारांविरोधात मनसेने रविवारी खळखट्याक आक्रमक आंदोलन करीत इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरविले. येत्या काळात मराठी बोर्ड नसणाऱ्या दुकानांविरोधातही अशाच प्रकारे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहरध्यक्ष मनदिप रोडे यांनी दिला आहे.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्टÑातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्या, असा कायदा असताना याचे पालन कुणी करीत नाही. या विरोधात मनसे आंदोलन उभारणार असा इशारा दिला होता. महाराष्टÑात मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे, मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिज, सर्व सामान्य जनतेला दुकानाच्या पाट्या समजल्या पाहिजे यासाठी मनसेची ही आग्रही भूमिका आहे.यापूर्वी मनसेने चंद्रपुरातील व्यापारी, कार्यालयांना मराठी पाट्यांबाबत इशारा दिला होता. यानुसार रविवारी तुकूम तसेच नागपूर मार्गावर दुकानावरील इंग्रजी बोर्ड उतरविले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषेची अस्मिता जपलीच पाहिजे, अशी नारेबाजी केली. चंद्रपुरातील व्यापारी, कार्यालयांनी दुकानांच्या पाट्या, फलक येत्या काळात मराठी भाषेत न केल्यास त्यांच्या विरोधातही अशाच प्रकारे खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, राहुल चव्हाण, व्यंकटेश मुक्तलवार, आशिष उराडे, राजा मेहता, तिरुपती गड्डमवार, प्रदीप इटनकर, कपील डंबारे, रोहन मुकेश, गौरी, राहुल मंडल, सन्नी मंडल, राजेश सुल्तान आदी मनसे कार्यकर्त्यांचा सहभाग होता.