शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडचा शिक्षण विभाग झाला अस्थिपंजर

By admin | Updated: January 14, 2015 23:06 IST

रिक्त पदांमुळे येथील शिक्षण विभागाची अवस्था अतिशय अस्थिपंजर झाली आहे. केवळ दोन विस्तार अधिकारी संपुर्ण शिक्षण विभागाचा गाडा हाकत आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे चार पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

नागभीड : रिक्त पदांमुळे येथील शिक्षण विभागाची अवस्था अतिशय अस्थिपंजर झाली आहे. केवळ दोन विस्तार अधिकारी संपुर्ण शिक्षण विभागाचा गाडा हाकत आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे चार पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.येथील गटशिक्षणाधिकारी पी.बी.मांढरे यांचे मागील वर्षी स्थानांतरण झाले. तेव्हापासून येथील गट शिक्षणाधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. सदर पद रिक्त झाल्यापासून या पदाचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी माणिक खुणे सांभाळत आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे येथे पाच पदे मंजूर आहेत. आश्चर्य असे की, त्यापैकी वेगवेगळ्या कारणांनी ही तीन पदे रिक्त आहेत. येथील शिक्षण विस्तार अधिकारी माणिक खुणे हे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रभारासह शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नागभीड आणि बाळापूर या दोन बिटांचाही प्रभार सांभाळत आहेत. खुणे यांच्यावरील प्रभाराचा भार एवढ्यावरच थांबला नाही तर, शालेय पोषण आहाराचे अधिक्षक म्हणूनही प्रभार सांभाळावा लागत आहे. या पदासोबतच सर्व शिक्षा अभियानातंर्गत मंजूर करण्यात आलेले अभियंत्याचे पदसुद्धा रिक्त आहे. सद्यस्थिती सर्वशिक्षा अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणावर वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या कामांची देखभाल आणि मुल्यांकन कशी होत असेल, हा देखील संशोधनाचा विषय आहे. याच अभियानातंर्गत मंजूर असलेले रोखपालाचे पदसुद्धा रिक्त असल्याची माहिती आहे. शिक्षण विभागाला रिक्त पदाचे एवढे ग्रहण लागले आहे की, प्रशासनाचा गाडा खऱ्या अर्थाने जे हाकत असतात त्या कनिष्ठ सहाय्यकांचे ३ पदे सुद्धा रिक्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)