शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड पोलिस ठाण्याला बदल्यांचे ग्रहण केवळ; वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 14:29 IST

Chandrapur : वर्षभरात तीन ठाणेदारांच्या बदल्या

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : एका ठिकाणी नियुक्ती दिलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करू नये, असे संकेत आहेत. मात्र, नागभीड येथील ठाणेदारांच्या बदल्यांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास हे संकेत पायदळी तुडविल्याचे लक्षात येते.

नागभीड येथे एका वर्षात चक्क तीन ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आणि चौथ्या ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या पाहिल्या तर बदल्यांचे अधिकार असलेल्या वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

२०२३ च्या दुसऱ्या चरणात नागभीड पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी योगेश घारे यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच ठाणेदार योगेश घारे यांनी या ठाण्यावर चांगली पकड निर्माण केली आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले. घारे यांनी सुरू केलेली "सायरन गस्त" काहींच्या टीकेचा विषय ठरली होती. मात्र, या सायरन गस्तीमुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण नक्कीच कमी झाले होते.

मात्र, अचानक २८ जानेवारी २०२४ रोजी योगेश घारे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आणि नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून विजय राठोड यांना नियुक्त करण्यात आले. ते येथे स्थिरस्थावर होत असतानाच अवघ्या सहा महिन्यांत ठाणेदार विजय राठोड यांचे ६ ऑगस्ट २०२४ रोजी स्थानांतरण करण्यात आले आणि अमोल काचोरे यांची नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल काचोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने काचोरे यांची आता निदान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी बदली होणार नाही, असेच वाटत होते. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अवघ्या दोन महिन्यांत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ठाणेदार अमोल काचोरे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. आता नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून रमाकांत कोकाटे यांनी तत्काळ प्रभावाने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून प्रभार स्वीकारला आहे. 

तीन वर्षे तरी बदली करू नये येथील ठाणेदारांच्या पदाला लागलेले बदल्यांचे ग्रहण लक्षात घेता, हे ग्रहण येथेच संपून आणि कोकाटे यांनी पूर्ण तीन वर्षे नागभीडच्या ठाणेदारपदी कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किमान तीन वर्षे तरी ठाणेदारांची बदली करू नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर