शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग निविदा निघाल्याने आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या बहूप्रतिक्षित ब्राडगेज रेल्वे मार्गासाठी विभागाकडून निविदा मागविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.येथील रेल्वे लाईन परिसरातील जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात काहिंना नोटीस देण्यात आल्याने लवकरच या मागार्चे कामही सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी २०१४ मध्ये निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेही या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. मात्र या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात होते. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे.या कबुलीनंतर या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागार्साठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर का, होईना पण या रेल्वे मागार्साठी विभागाने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या मागार्चे तीन टप्प्यात काम होणार असून पहिल्या टप्प्यात नागभीड - भिवापूर , दुसऱ्या टप्प्यात भिवापूर - उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड - नागपूर असे काम विद्युतीकरणासह होणार असल्याची माहिती आहे.एकमेव मार्गमध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला होता. १०६ कि.मी. लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून नागपूरला येणाºया वर्धाऐवजी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे.रेल्वे विभागाने या मार्गाच्या निविदा काढल्याने हा प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. हा मार्ग चंद्रपूर , गडचिरोली या जिल्ह्यांसाठी प्रगतीमार्ग ठरणार आहे.- संजय गजपुरे, जि.प. व सल्लागार सदस्य झोन रेल्वे कमेटी.

टॅग्स :railwayरेल्वे