शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकंपनीने दिले रेल्वे विभागाला पत्र : १ डिसेंबरपासून रेल्वे बंद ठेवणार ?

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.१९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी कमी होऊ लागली. सुरूवातीला १९५२ रोजी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी संसदेत करण्यात आली होती. त्यानंतर १९८२-८३ रोजी या मागणीचा पुनरूच्चार झाला होता. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. मात्र या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.मार्गासाठी ७०८ कोटी ११ लाखांचा खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलणार आहे. राज्य सरकारने तशी कबुलीही दिली. या क्षेत्राचे खासदार नेते यांनी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना पण या रेल्वे मार्गासाठी संबंधित विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपणीने येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती आहे. हे गृहित धरूनच १९१३ पासून अव्याहत धावणारी ही नॅरोगेज रेल्वे गाडी बंद होणार असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कालखंडापासून सुरू असलेल्या या रेल्वेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली. परंतु, प्रवाशांची संख्या वाढल्याने काळानुसार निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. नॅरोगेज झाल्यास नागपूर-नागभीड अंतर कमी कालावधीत गाठात येईल. यामुळे संपर्काची गती वाढणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे