शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:15 IST

नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.खरे तर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ कीमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नसल्याने हा मार्ग उपेक्षेचा बळी ठरत आला आहे.दरम्यान, केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने या सरकारकडून या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. या बाबीस आता साडे चार वर्षांचा कालावधी होत असला तरी या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात आहे. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलायचा आहे. आणि राज्य सरकारने तशी कबुलीही दिली आहे.खरे तर हा मार्ग केवळ गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राशीच सबंधित नाही तर नागपूर, रामटेक व भंडारा या लोकसभा क्षेत्रांशीही सबंधित आहे. याचा अर्थ नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही या मार्गाशी संबंध आहे.ना. गडकरी यांनी आपले वजन खर्च केले तर अर्थसंकल्पात निश्चितच भरीव तरतूद होण्यास वेळ लागणार नाही, असे यासंदर्भात बोलले जात आहे.एकमेव मार्गमध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला आहे. १०६ कीमी लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते .महाप्रबंधकही संदिग्धद.पू.म.रेल्वेच्या बिलासपूर झोनचे महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांनी गुरूवारी नागभीड स्टेशनला भेट दिली असता माध्यमांनी त्यांना यासंदर्भात छेडले असता तेही याबाबत स्पष्ट उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे या रेल्वे मागाबाबत, शंकाच आहे.